HomeनांदेडRailway Struggle Committee: लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर

Railway Struggle Committee: लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर

मुखेड| लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप श्रीराम कोडगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक १७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण शेठ महाजन यांची होती. बैठकीत रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली व पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली.

दरम्यान, समितीच्या प्रमुख मार्गदर्शकपदी अरुण शेठ महाजन, डॉ. माधवराव पाटील उच्चेकर, मल्लिकार्जुन एकाळे, बालाजी बंडे, विठ्ठलराव इंगळे हे राहतील तर तसेच सल्लागार म्हणून अॅड. सुनील पौळकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, अॅड. विजय कोत्तापल्ले हे राहतील असे सर्वानुमते ठरले.संघर्ष समितीच्या कार्यकारणीत कार्याध्यक्ष म्हणून डॉ. व्यंकट माणिकराव भोसले सुभेदार, सचिव ज्ञानेश्वर बालाजीराव डोईजड, उपाध्यक्ष दत्तात्रय चौधरी,संभाजी पाटील उंदरीकर, असद बलकी, श्रीमती अल्काताई चिद्रे यांची निवड करण्यात आली.सहसचिवपदी सचिन देबडवार व सुधाकर जाधव,

WhatsApp Image 2026 03 17 at 20.42.06 1 Railway Struggle Committee: लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर

कोषाध्यक्षपदी अण्णासाहेब जाहीर जुनेकर,संघटक शेखर पाटील, शिवशंकर पाटील कलंबरकर, सहसंघटक सुनील पाटील तरगुडे, अविनाश देशमुख प्रसिद्धीप्रमुख अनिल कांबळे ,बबलू मुल्ला, नामदेव श्रीमंगले, विठ्ठल पाटील येवतीकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून संजय मुक्कावार, सुभाष जांभळीकर, शादुल होनवडजकर, संजय यलमवाड, गोविंद वाडेकर यांचा समावेश आहे. या बैठकीस नामदेव जाधव, हरिदास सूर्यवंशी, मारुती जांभळीकर, पद्माकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सर्वांनी एकमुखाने मत व्यक्त करताना सांगितले की, प्रथम लोकप्रतिनीधींची भेट घेवून निवेदनामार्फत रेल्वे मार्गाचे महत्व विषद करण्यात येणार आहे.व शासन दरबारी पाठपुरावा करण्याची विंनती करण्यात येणार आहे.
मुखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्ग अत्यंत आवश्यक असून यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. रेल्वे मार्गासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या नव्याने स्थापन झालेल्या संघर्ष समितीमुळे लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन रेल्वे मार्गाच्या मागणीला अधिक बळ मिळणार असून, येत्या काळात व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments