Railway Struggle Committee: लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर
मुखेड| लातूर रोड–मुखेड–बिलोली–बोधन या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या रेल्वे संघर्ष समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते दिलीप श्रीराम कोडगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक १७ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण शेठ महाजन यांची होती. बैठकीत रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली व पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली.
दरम्यान, समितीच्या प्रमुख मार्गदर्शकपदी अरुण शेठ महाजन, डॉ. माधवराव पाटील उच्चेकर, मल्लिकार्जुन एकाळे, बालाजी बंडे, विठ्ठलराव इंगळे हे राहतील तर तसेच सल्लागार म्हणून अॅड. सुनील पौळकर, डॉ. श्रावण रॅपनव...
