हिमायतनगर, अनिल मादसवार| पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या दावते-इफ्तार कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी शेख रफीक शेख महबूब यांच्या पुढाकारातून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.


दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी अजाननंतर इफ्तार करण्यात आला. या प्रसंगी शहरातील विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचे दर्शन घडविले. रमजान महिन्यात उपवास करून अल्लाहची उपासना केली जाते, तसेच या पवित्र काळात सर्व धर्मीय एकत्र येत बंधुभाव वाढवितात, ही परंपरा हिमायतनगरमध्ये वर्षानुवर्षे जपली जात आहे. यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हाके, पोलीस निरीक्षक अमोल भगत, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्दन ताडेवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब यांनी सर्व मान्यवरांचे दोस्ती टोपी देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी बोलताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे अभिनंदन करून आगामी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हिमायतनगरची हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा कायम राखत सर्वांनी सण उत्सव शांततेत व आनंदात साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. या दावते-इफ्तार कार्यक्रमातून सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि बंधुभावाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.



तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, समदखान, अश्रफ भाई, आसलम भाई, नगरसेवक विठ्ठल ठाकरे, जिशान भाई, कलीम भाई, इलियास भाई, शरद चायल, संजय माने, संतोष मुद्देवाड, गजानन तुप्तेवार, फेरोज खान, विजय वळसे पाटील, अन्वरखान, जफर लाला, शेख रहिम भाई, राजू बंडेवार, खालीद भाई, राजू जैस्वाल, सुभाष दारवंडे, डॉ आनंद माने, शंकर पाटील, डॉ गणेश कदम, गोतम पिंचा, दिलीप लोहरेकर, गोविंद बंडेवार, शेख माजीद तरकारीवाले, प्रविण मामीडवार, संतोष अप्पा पळशीकर, बाळू अण्णा चवरे, अ.बाकी भाई, सय्यद मनानभाई, रामराव सूर्यवंशी, डॉ प्रकाश वानखेडे, संतोष शिंदे, दत्तात्रय तिमापुरे, सुभाष शिंदे, असलम भाई, सय्यद सादीक,

प्रभाकर क्षीरसागर, सतीश गोपतवाड, मसुद भाई, आसद मौलाना, प्रविण कोमावार, पापा पार्डीकर, मजहर भाई नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर, पत्रकार तसेच हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ गफार कार्लेकर, मनानभाई यांनी केले इतर पार्टी पूर्वी नगराध्यक्ष शेख रफीक शेख महबूब यांनी सर्व मान्यवरांचा दोस्ती टोपी देऊन स्वागत व सत्कार केला.



