Daawat-Iftar : हिमायतनगरात दावते-इफ्तारमधून हिंदू-मुस्लिम एकोप्याचा प्रभावी संदेश
हिमायतनगर, अनिल मादसवार| पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या दावते-इफ्तार कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा प्रतिष्ठित व्यापारी शेख रफीक शेख महबूब यांच्या पुढाकारातून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यंदाही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.
दिनांक १७ मार्च रोजी सायंकाळी अजाननंतर इफ्तार करण्यात आला. या प्रसंगी शहरातील विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचे दर्शन घडविले. रमजान महिन्यात उपवास करून अल्लाहची उपासना केली जाते, तसेच या पवित्र काळात सर्व धर्मीय एकत्र येत बंधुभाव वाढवितात, ही परंपरा हिमायतनगरमध्ये वर्षानुवर्षे जपली जात आहे. यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर, उ...
