HomeनांदेडMla Srijayatai Chavan : गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत आ. श्रीजयाताई चव्हाण...

Mla Srijayatai Chavan : गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत आ. श्रीजयाताई चव्हाण यांची भेट

नांदेड/भोकर| गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण (sriJayatai Chavan) यांची भेट घेण्यात आली. ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सुरू असलेल्या या मोहिमेबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.

जागतिक महिला दिनापासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत वय १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येत आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी Rahul Kardile, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली (Meghna Kavli), उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे तसेच माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या लसीबाबत समाजमाध्यमांवर काही ठिकाणी खोटा व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले असून नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करून केवळ आरोग्य विभागाच्या अधिकृत माहितीसच विश्वास ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सध्या जगातील १६० देशांमध्ये एचपीव्ही लसीकरण सुरू असून भारत हा १६१ वा देश आहे.

यावेळी आ. जयाताई चव्हाण यांनी १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींनी एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करणारा व्हिडिओ संदेश लवकरच देणार असल्याचे सांगितले.

तसेच ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली.
या भेटीवेळी स्वीय सहाय्यक एकनाथ खानसोळे, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार तसेच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अत्रीनंदन पांचाळ उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments