HomeनांदेडNanded News : जवळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेचा...

Nanded News : जवळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेचा शुभारंभ

हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रशासन अधिक लोकाभिमुख करून शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ या विशेष मोहिमेचा शुभारंभ हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथे उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या मोहिमेच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले-प्रमाणपत्रे, जमीन विषयक अभिलेखे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत अधिक सुलभ व सोप्या पद्धतीने पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांना शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत प्रशासन व जनता यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा उद्देश या शिबिरामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आपल्या शासकीय कामांचा निपटारा करून घ्यावा. शासनाच्या योजना आणि सेवा प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

FB IMG 1773546617665 Nanded News : जवळगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ मोहिमेचा शुभारंभ

कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शिंदे, तहसीलदार पल्लवी टेमकर, नायब तहसीलदार पठाण, नायब तहसीलदार पंगे, कृषी विभागाचे काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नखाते यांच्यासह महसूल विभागातील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

तसेच माजी पंचायत समिती सदस्य विजय वळसे, विकास पाटील देवसरकर, दिगंबर शिरफुले, संतोष कदम डोल्हारी, ज्ञानेश्वर माने यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा सुलभरीत्या उपलब्ध होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments