Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

1001701433 Women's Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

लोहा | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोहा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा व जलचळवळीच्या प्रणेते प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वेळेवर लसीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी यावेळी केले.

प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद धनसडे यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शमा कोरपेनवार-बुक्तरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले. ९ ते १४ वर्षे तसेच १५ ते ४० वर्षे वयोगटातील मुली व महिलांसाठी हे लसीकरण उपयुक्त असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. योग्य वेळी लसीकरण केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य मेडिकेअर हॉस्पिटलमार्फत सुरू असून अनेक रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे डॉ. शमा कोरपेनवार-बुक्तरे यांनी सांगितले.

1001701443 Women's Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद धनसडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शमा कोरपेनवार-बुक्तरे, प्रा. डॉ. शारदा मिलिंद धनसडे, माजी नगरसेविका शोभाताई बगडे, सौ. डोंगरे, निदान क्लिनिकल लॅबोरेटरीच्या संचालिका अरुणा संदीप कदम, आनंद धनसडे, अनिता आनंद धनसडे, उत्तमराव धनसडे, भारतबाई धनसडे, डॉ. आचणे, डॉ. बुक्तरे, नगरसेवक अविनाश पवार, सतीश निखाते, तुकाराम दाढेल, सदा तेलंग, मंजलवाड, अन्वर पठाण, व्यंकट जंगले, सुधीर धनसडे, तनय धुतमल यांच्यासह हॉस्पिटलचा स्टाफ उपस्थित होता.

कार्यक्रमानंतर प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी मेडिकेअर हॉस्पिटलची पाहणी करून येथील उपचारपद्धती व सुविधा यांचे कौतुक केले तसेच डॉ. धनसडे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top