Friday, June 26

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

कंधार (सचिन मोरे) कंधार लोहा रोडवर दीड महिन्याचे हरणाचे पाडस सामाजिक कार्यकर्ते राज गोडबोले यांना 3 मार्च रोजी दुपारी सापडले. अचानक सापडलेले पाडस पाहून गोंधळलेल्या गॊडबोले यांनी तात्काळ कंधार पोलीस स्टेशन गाठून ते पाडस त्यांनी 3 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत वनविभागाकडून समजलेली माहिती अशी की, कंधार शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर दीड ते दोन महिन्याचे हरणाचे गोंडस पाडस सामाजिक कार्यकर्ते राज गोडबोले यांना 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजता घाबरलेल्या अवस्थेत मुख्य रस्त्यालगत सापडले. गोडबोले यांनी कसलाच विचार न करता. हे हरणाचे पाडस त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या ताब्यात दिले .

पाडस ताब्यात देताच पोलीस निरीक्षक जाधव यांनी याबाबत तात्काळ वनविभागाचे वनपाल धोंडगे व वनरक्षक घोडके यांना घटनेविषयी कळवून तात्काळ पोलीस स्टेशन ल येण्याबाबद सूचना दिल्या. सूचना प्राप्त होताच वनरक्षक घोडके यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत ते पाडस ताब्यात घेऊन त्यांना उपचारासाठी पशु वैद्यकीय दवाखाना कंधार येथे घेऊन जाऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

त्या पाडसास त्याच्या आईच्या स्वाधीन करणार– घोडके
3 मार्च रोजी पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व सामाजिक कार्यकर्ते गोडबोले यांनी दुपारी 4 वाजता पाडसास वनविभागाच्या ताब्यात दिले.
दिल्यानंतर आम्ही तात्काळ पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाऊन पाडसावर प्राथमिक उपचार केले.

सध्या ते पाडस ठणठणीत असून आम्ही युद्ध पातळीवर त्याच्या आईचा शोध घेत आहोत लवकरच ते पाडस व त्याच्या आईची भेट घालून देण्यासाठी आमची वनविभागाची टीम प्रयत्नाची पराकाष्टा करत असून लवकरच आम्हाला यश मिळेल असा आशावाद वनरक्षक शिवसांब घोडके यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!