Friday, June 26

Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड

हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील श्री परमेश्वर महाशिवरात्री यात्रा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून शेवटच्या दिवसांत यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

IMG20260301195638 scaled Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
oplus_6291456

मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या यात्रेत आकाश पाळणे, ‘सुनामी’ राईड, लहान-मोठी रेल्वे, विविध मनोरंजनाचे खेळ तसेच घरगुती व सजावटीच्या साहित्याच्या दुकानांमुळे शहरात अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसत आहे.

IMG 20260302 105133 Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
Oplus_16908288

संध्याकाळ होताच प्रकाशझोतात नटलेले मैदान, गजबजलेली दुकाने आणि खेळण्यांच्या स्टॉलवर मुलांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. महिला-पुरुष, लहान-थोर नागरिक खरेदीसाठी गर्दी करत असून खेळण्यांपासून कपडे, भांडी, सजावटीचे साहित्य, खाद्यपदार्थ अशा विविध वस्तूंना मोठी मागणी आहे.

IMG 20260302 105300 Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
Oplus_16908288

होळी व रंगपंचमी नंतर यात्रा ओसरणार असली तरी अंतिम दिवसांत खरेदी व मनोरंजनासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागातूनही भाविक व नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

IMG 20260302 101520 Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
Oplus_16908288

धार्मिक उत्साहाबरोबरच व्यापार-उद्योगाला चालना देणारी ही यात्रा हिमायतनगरकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरली आहे. परंपरा, श्रद्धा आणि मनोरंजन यांचा संगम साधत श्री परमेश्वर महाशिवरात्री यात्रेने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!