करियरनांदेड

Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

नांदेड|  संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी (जि. नांदेड) यांच्या वतीने दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज सैनिकी विद्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय ‘वेदायन’ विज्ञान प्रदर्शनात महात्मा फुले हायस्कूल, बाबानगर/विजयनगर येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.

या विज्ञान प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महात्मा फुले हायस्कूलच्या इयत्ता ९ वीतील चि. आनंद प्रल्हाद सेवकर व चि. आयुष सतीश मोरे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा मान मिळाला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम ७,००० रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘स्मार्ट व्हायब्रोथेरपी सिस्टीम’ हा आनंद टेक्नॉलॉजीद्वारे विकसित केलेला एआय (AI) आधारित वैद्यकीय सहाय्यक प्रकल्प आहे. ही प्रणाली शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग तसेच शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. नियंत्रित व्हायब्रेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्नायू सक्रिय करणे, रक्तप्रवाह वाढवणे व वेदना कमी करणे यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार वेळ व तीव्रता नियंत्रित करता येत असल्याने, कमी खर्चात अधिक सुविधा देणारी ही स्वदेशी प्रणाली परीक्षकांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरली.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उपाध्यक्षा माजी आमदार अमिताताई चव्हाण, नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व संस्थेचे सचिव डी. पी. सावंत, आमदार ॲड. श्रीजयाताई चव्हाण, सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, खजिनदार ॲड. उदय निंबाळकर, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा कदम, उपमुख्याध्यापक ए. आर. कल्याणकर, पर्यवेक्षक डी. एल. खानजोडे, एस. व्ही. जाधव, दिपक खंदारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान विषयाचे ज्येष्ठ अध्यापक पी. आर. कोत्तावार व ए. डी. रायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले. या यशामुळे महात्मा फुले हायस्कूलचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!