HomeनांदेडHimayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले

Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले

हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील अनेक वर्षा पासून हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची (Shiva statue site) मागणी करूनही आत्तापर्यंत तोडगा का.. निघाला नाही. हि मागणी लावून धरत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 17 फेब्रुवारीपासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनामुळे शहरातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष व प्रभारी मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, “शासनाच्या अधिनस्त राहून जागेसाठी प्रयत्न करू” असे तोंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आमरण उपोषण (hunger strike) मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी म्हणजेच स्वाभिमानी समभाजी ब्रिगेडचे माधव शिंदे, बालाजी ढोणे यांनी जाहीर केल्याने शिवपुतळ्याच्या जागेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

IMG20260217144703 02 Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले

तीन वर्षांपासून मागणी प्रलंबित
दि.10 ऑगस्ट 2023 रोजी नगरपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अधिकृत मागणी करण्यात आली होती. मात्र, तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रशासकीय कारणांचा आधार घेत हा विषय सातत्याने प्रलंबित ठेवण्यात आल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

IMG20260217154610 01 Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले
oplus_0

निवडणुकीनंतरही उदासीनता
नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर तरी या विषयाला प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, निवडणुकीनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, पुतळ्या बाबतचे परिपत्रक दाखवून आंदोलनकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे, तर प्रत्यक्षात जागा निश्चित करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो असेही उपोषणाला पाठिंबा जाहीर केलेल्यांची बोलून दाखविला आहे.

IMG20260217144841 01 Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले
oplus_0

“ही लाजिरवाणी बाब” – संतप्त प्रतिक्रिया
“रयतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या जाणत्या राजाच्या पुतळ्यासाठी आज आमरण उपोषण करावे लागत असेल, तर ही प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

IMG20260217152304 01 Himayatnagar : शिवपुतळा जागेसाठीच्या आमरण उपोषणाने हिमायतनगर शहर तापले
oplus_0

जयंतीपूर्वी प्रश्न सुटणार का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपूर्वीच हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची निश्चितीसाठी हे आंदोलन पेटले असून, प्रशासन या संवेदनशील विषयावर कोणता तोडगा काढते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. लेखी आश्वासन न दिल्यास उपोषण अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments