Wednesday, May 13

Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ

हिमायतनगर ( उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 चा शुभारंभ दिनांक 13 शुक्रवारी एकादशी च्या शुभमुहूर्तावर भक्तिमय वातावरणात झाला.

IMG20260213061928 01 Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ
oplus_0

यात्रा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिराचे सेक्रेटरी अनंता देवकते यांच्या हस्ते सहकुटुंब भगवान श्री परमेश्वर देवाचा अभिषेक महापुजा संपन्न झाली. त्यानंतर अखंड हरीनाम, वीणा पारायण सोहळ्याची सुरुवात आरती पूजा करून झाली.

IMG20260213062521 01 Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ
oplus_0

पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वैदिक मंत्रोच्चार, हरहर महादेवच्या जयघोषात भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक, दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला. या वेळी देवकते कुटुंबासह मान्यवर, संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, अक्कलवाड सर, बाळू अण्णा चवरे, मारोती लुमदे, विश्वस्त, सेवेकरी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG20260213063200 01 Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ
oplus_0

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आगामी 15 दिवसात दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, हरिनाम सप्ताह, शेतकरी व शालेय विद्यार्थी यांच्यासाठी विविध स्पर्धाचे व यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व सर्व संचालक मंडळी व गावकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!