नांदेडकरियर

Awarded : युवा पत्रकार विजय वाठोरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर

नांदेड | हिमायतनगर तालुक्यातील युवा पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले मौजे सरसम (बु.) येथील विजय नारायण वाठोरे यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद यांच्यातर्फे दिला जात असून, पुरस्काराचे निवडपत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी प्रदान केले आहे.

हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गोर-गरीब, वंचित, शोषित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, प्रशासनावर जबाबदार दबाव ठेवत जनसामान्यांना न्याय मिळवून देणारे निडर पत्रकार म्हणून विजय वाठोरे यांची ओळख आहे. त्यांच्या लेखणीतून सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविण्यात आला असून, त्यामुळे तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

विजय वाठोरे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असून, पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या ‘दलित पॅंथर’ संघटनेचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी विविध पत्रकारिता व सामाजिक संघटनांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर अनेक पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

हा मानाचा पुरस्कार रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय, भावसार चौक, नांदेड येथे होणाऱ्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे, प्रदेशाध्यक्ष प्रियंका बागुल, वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गंगाधर वाघमारे, तसेच विविध दैनिकांचे संपादक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून विजय वाठोरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button