Awarded : युवा पत्रकार विजय वाठोरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर
नांदेड | हिमायतनगर तालुक्यातील युवा पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले मौजे सरसम (बु.) येथील विजय नारायण वाठोरे यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद यांच्यातर्फे दिला जात असून, पुरस्काराचे निवडपत्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी प्रदान केले आहे.
हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून गोर-गरीब, वंचित, शोषित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, प्रशासनावर जबाबदार दबाव ठेवत जनसामान्यांना न्याय मिळवून देणारे निडर पत्रकार म्हणून विजय वाठोरे यांची ओळख आहे. त्यांच्या लेखणीतून सामाजिक अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठविण्यात आला असून, त्यामुळे तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर...
