HomeकरियरNanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा...

Nanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा इतिहास

नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सिकंदराबाद येथील न्यू भोईगुडा, रेल कलारंग येथे आयोजित 70 व्या रेल्वे सप्ताह समारंभात उल्लेखनीय कामगिरी करत एकूण चार प्रतिष्ठेचे कार्यक्षमता शिल्ड्स पटकावून विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला (The Nanded division) आहे.

नांदेड विभागाने ब्रिजेस (पूल) आणि रेल मदत (Rail Madad) या दोन महत्त्वाच्या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत स्वतंत्र शिल्ड्स मिळवले. तसेच, समपातळी क्रॉसिंग निर्मूलन या श्रेणीत गुंतकल विभागासोबत संयुक्त शिल्ड आणि सर्वोत्तम देखभाल केलेल्या वैद्यकीय मदत व्हॅन (MRV) साठी विजयवाडा विभागासोबत संयुक्त शिल्ड प्राप्त केली. त्यामुळे एकूण चार प्रमुख कार्यक्षमता शिल्ड्स नांदेड विभागाच्या खात्यात जमा झाल्या आहेत.

या समारंभात वैयक्तिक उत्कृष्टतेचीही दखल घेत, उल्लेखनीय योगदानाबद्दल एका अधिकाऱ्यास व सात कर्मचाऱ्यांना “विशिष्ट रेल सेवा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत :
श्री व्ही. सुजीत कुमार – वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय)
श्री भरत गुर्जर – वाणिज्य निरीक्षक
श्री संजय श्रीवास्तव – वरिष्ठ विभागीय अभियंता, नांदेड
श्री उत्तम कुमार – वरिष्ठ विभागीय अभियंता (पथ)
श्री पंकज कुमार – वरिष्ठ विभागीय अभियंता (वर्क्स)
श्री के. अजित दास – वरिष्ठ विभागीय अभियंता (पथ)
श्री नवीन प्रजापती – तंत्रज्ञ श्रेणी–II
श्री राजेश वडक्केरथ – मुख्य लोको निरीक्षक

IMG 20260129 WA0012 Nanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा इतिहासही सर्व कार्यक्षमता शिल्ड्स नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी संबंधित शाखा अधिकाऱ्यांसह दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजय कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते स्वीकारल्या. वैयक्तिक पुरस्कारही महाव्यवस्थापकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

हे यश नांदेड विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा, पायाभूत सुविधा देखभाल, प्रवासी सेवा, मालवाहतूक व कार्यक्षमता उत्कृष्टतेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण, संघभावनेतून केलेल्या आणि समर्पित प्रयत्नांचे प्रतीक आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी सर्व पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments