HomeनांदेडPaased away : पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे दुःखद...

Paased away : पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे दुःखद निधन

हिमायतनगर/नांदेड | पद्मशाली समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमेश्वर तुकाराम मादसवार यांचे आजारपणामुळे आज सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पद्मशाली समाजासह नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार हे समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी सामाजिक कार्यातून अनेकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक अनुभवी व मार्गदर्शक व्यक्ती गमावली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता बोरगडी रोड, वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्व. परमेश्वर तुकाराम मादसवार यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तेष्ट व मोठा सामाजिक परिवार आहे. ते पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष संजय परमेश्वर मादसवार यांचे वडील होते.🙏 त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे ॐ शांती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments