Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hind Di Chadar : हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !
नांदेड लेख November 24, 2025

Hind Di Chadar : हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !

NNL TeamBy NNL TeamNovember 24, 202514
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद साहिब हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता नानकी देवी असे होते. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते; पण युद्धभूमीवरील त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना तेग बहादुर म्हणजे ‘तलवारीसारखा धैर्यवान’ असे नाव दिले. बालपणापासूनच त्यांच्यात शौर्य, नम्रता आणि अध्यात्मिक चिंतन यांचा सुंदर संगम होता. त्यांनी सांसारिक किर्तीपेक्षा आत्मज्ञान आणि मानवसेवा हेच जीवनाचे खरे ध्येय मानले होते.

शीख गुरू परंपरा अडचणीत आली असताना गुरू शोधण्याचे काम श्री बाबा मखान शाह लबाना यांनी बाबा बकाला (अमृतसर) येथे याठिकाणी केले. ऐतिहासिक माहितीनुसार श्री बाबा माखनशहा लबाना यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजींना ओळखून ‘गुरु लाधो रे गुरू लाधो रे’ अशी घोषणा केली, आणि त्या क्षणापासून लबाना समाजाचे नाव शीख इतिहासात अजरामर झाले.

१६६४ मध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे शीख धर्माचे नववे गुरु झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण शांतता, करुणा आणि आत्मनिष्ठा होती. त्यांनी धर्माचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, धर्म म्हणजे आग्रह नव्हे, तर दुसऱ्याच्या श्रद्धेचा सन्मान करणे होय. त्यांनी भारतभर प्रवास करून समाजात मानवता, समता आणि सहिष्णुतेचे बीज रोवले. श्री आनंदपूर साहिब हे त्यांनी स्थापन केलेले पवित्र ठिकाण असून आजही ते शीख धर्माचे केंद्रस्थान आहे.

त्या काळात जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. या संकटाच्या वेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ते म्हणाले होते, ‘जर माझ्या बलिदानामुळे या निरपराधांच्या श्रद्धेचे रक्षण होणार असेल, तर तेच माझे सर्वोच्च धर्मकर्म ठरेल.’ हे शब्द केवळ त्यागाचे नव्हते, तर संपूर्ण मानवतेच्या रक्षणाची घोषणा करणारे होते. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना आग्रा येथे कैद करून दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली. पण त्यांनी तत्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. १६७५ मध्ये चांदणी चौक दिल्ली शीशगंज येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या पाठीमागे केवळ शीख अनुयायी नव्हते; तर त्यांच्या सोबत अनेक समाज उभे होते. विशेषतः सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात आपले मोलाचे योगदान दिले. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला गुरूजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरूनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात. लबाना, बंजारा, सिखलीकर समाजांनी श्री गुरू तेग बहादुर साहिबजींचा धर्माचे रक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण हा शिकवणीचा संदेश दूरवर पोहोचवला.

त्यांच्या व्यापारी व भ्रमणशील जीवनशैलीमुळे भारताच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आजही संपूर्ण देशामध्ये या प्रदेशांमध्ये या समाजाचे लोक भक्ती, सेवा आणि साहसाची परंपरा जिवंत ठेवून आहेत. श्री गुरु तेग बहादुरजींनी शिकवले की धर्म म्हणजे प्रेम, समता आणि सेवा. ते सांगतात की, धैर्य तलवारीत नसते, ते सत्यात असते. त्यांनी ‘‘न को बैरी, न ही बेगाना, सगल संग हम को बन आई’’ या गुरू वाणीच्या रचनेत त्यांनी सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे. याचा अर्थ ‘माझ्यासाठी कोणीही शत्रू नाही, परका नाही कारण सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे.’

त्यांची ५७ भक्तिगीते आणि ५७ सलोक (उपदेशपर पदे) गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येक ओळ सत्य, संयम आणि मानवतेचा संदेश देते. त्यांचा विचार समाजाला नवजीवन देतो. ते सांगतात की, धर्म ही मानवतेतील भिंत नसून पूल आहे; श्रद्धा हा संघर्ष नसून सहजीवनाचा प्रवाह आहे. त्यांनी आपल्या बलिदानाने धर्माचे रक्षण म्हणजे इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करण्याचा संदेश जनमानसात पोहोचवला. त्यांच्या बलिदानाने मानवाधिकारांचे मूलतत्व अधोरेखित झाले आहे.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव हे विठोबाचे परम भक्त होते. त्यांचे आध्यात्मिक कार्य पंजाब पर्यंत पोहचले आणि तेथील लोकांसाठी ते ‘भगत’ बनले. संत नामदेवांनी शीख धर्म प्रसारात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांना भगत नामदेव म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या पवित्र श्री गुरू ग्रंथ साहिब या शीख पवित्र धर्मग्रंथात संत नामदेव यांची ६१ पदे समाविष्ट आहेत. जी त्यांच्या एकेश्वरवाद, समानता आणि भक्तीचे प्रतिबिंब आहे. संत नामदेव यांनी आपल्या भक्तीच्या शिकवणुकीच्या माध्यमातून शीख धर्मावर खोलवर प्रभाव टाकला आहे. पंजाबमधील घुमान (गुरूदासपूर) या गावी संत नामदेवांचे मोठे स्थान आहे. तेथील लोक त्यांना बाबाजी म्हणून ओळखतात. अशाप्रकारे संत नामदेव यांनी महाराष्ट्र आणि पंजाब यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडली.

देवा पापछळे कांपते मेदिनी
दैसाचिने भारे वाटली अवनी
अधर्म प्रवर्तला माहितळी
ऐसे पापे कळी थोर आला…
असे म्हणत संत नामदेवांनी देशाटन केले. उत्तर भारतात भक्तीमार्गाचा प्रसार केला. या त्यांच्या प्रवासात शेवटी ते पंजाबात २० वर्ष स्थिरावले. याठिकाणी त्यांना पंजाबात बोहरदास, जल्ला, लध्दा, कंसो असे अनेक शिष्य मिळाले. ज्याठिकाणी संत नामदेव तप करायचे, त्याला ‘तपियाना साहिब’ म्हणून ओळखले जाते.

शीख धर्माचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड ही असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, ‘सब सिक्खन को हुकम है गुरू मान्यो ग्रंथ साहिब’ असा उपदेश दिला होता. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने (नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड) या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत राज्यभर प्रचार, प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे संकेतस्थळ आणि गुरु तेग बहादुरजींच्या बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान झाले. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी असे विविध समुदाय या प्रसंगी एकत्र येऊन हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचा संदेश घराघरांत आणि जनमाणसांत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. आजही त्यांच्या शहिदीचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत आहे. आणि जोपर्यंत या भूमीवर मानवतेवर प्रेम करणारा एकही मनुष्य आहे, तोपर्यंत ‘हिंद दी चादर’ अमर राहील.

– रामेश्वर नाईक, समन्वयक, हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वां शहीदी समागम समिती महाराष्ट्र राज्य.

freedom and humanity! Hind Di Chadar The shield of religion
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGramsevak Award : नांदेड जिल्ह्यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी मोठी आर्थिक उलाढाल ? निवड समितीकडे तक्रार
Next Article Shiv Sena : हिमायतनगरात शिवसेना शिंदे गटाची मंगळवारी सांयकाळी भव्य सभा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chaitanyanagar-Sangvi : चैतन्यनगर-सांगवी वॉकिंग ट्रॅकला लोखंडी कुंपण आणि तरोडा कॅनाल रोडवरील लाईट सुरु करा

July 24, 2025

Dhamma Chakra Promotion Day ; एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

October 12, 2024

Be careful : उपवासाला भगर खाताना काळजी घ्या – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

September 23, 2025

Mahur ; स्वच्छ माहूर सुंदर माहूर साठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार

September 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

SN Shingarputle ; एस एन शिंगारपुतळे यांचे निधन ;आज अंत्यसंस्कार

Chief Minister Devendra Fadnavis : मोठ्या गुंतवणुकीमुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Hind-Di-Chadar : नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन

Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Collector Abhijit Raut sent Maharakhi : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महाराखी, राख्या व सदिच्छापत्र सीमेकडे रवाना – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?