Friday, June 26

Tag: Hind Di Chadar

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमात जिल्हाधिकाऱ्यांचा सेवाभाव

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमात जिल्हाधिकाऱ्यांचा सेवाभाव

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| “हिंद-दी-चादर” उपक्रमाअंतर्गत आयोजित श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर सेवेत सहभाग घेत भाविकांची सेवा केली. रांगेत बसलेल्या भाविकांना स्वतः लंगर वाढताना पाहून उपस्थितांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाचा प्रमुख अधिकारी सेवाभावाने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला विशेष सामाजिक व आध्यात्मिक उंची प्राप्त झाली. लंगर ही सेवा, समता व बंधुभाव यांचे प्रतीक असून, या परंपरेत सहभागी होत जिल्हाधिकाऱ्यांनी शीख धर्मातील मानवता, समानता आणि निःस्वार्थ सेवाभावाच्या मूल्यांना अभिवादन केले. या ठिकाणी सुरू असलेली लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली ठेवण्यात आली आहे. शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असून, संपूर्ण परिसर भक्ती, सेवा आणि श्र...
Hind-Di-Chadar : हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

Hind-Di-Chadar : हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

नांदेड, धार्मिक
नांदेड| “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली. हिंद-दी-चादर कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधान परि...
Hind Di Chadar : हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !

Hind Di Chadar : हिंद दी चादर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच !

नांदेड, लेख
धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद साहिब हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता नानकी देवी असे होते. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते; पण युद्धभूमीवरील त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना तेग बहादुर म्हणजे ‘तलवारीसारखा धैर्यवान’ अ...
error: Content is protected !!