Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Ruperi Sonsala : ‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाटमधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला
नांदेड मनोरंजन October 22, 2025

Ruperi Sonsala : ‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाटमधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला

पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी पाडवा पहाट झंकारली  
NNL TeamBy NNL TeamOctober 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मूकचित्रपटांच्या प्रारंभीच्या पडद्यापासून ते ‘दादा कोंडके’ यांच्या हास्यरसपूर्ण चित्रपटांपर्यंतचा मराठी चित्रपटसृष्टीचा झळाळता प्रवास नांदेडकरांनी ‘रुपेरी सोनसळा’ या मनोवेधक संगीत सोहळ्यात दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवला. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, बाळकृष्ण माडे, सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, जयमाला शिंदे, सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुवर्णयुगाला उजाळा देणारा हा कार्यक्रम ‘पाडवा पहाट’च्या उत्सवी वातावरणात पार पडला.

जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ या उत्तरोत्तर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेल्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रातील पहिल्या कार्यक्रमाला नांदेड महानगरातील हजारो रसिक श्रोते उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला तरुणाईने. गर्दी केली होती.

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व त्यांच्या टीमने दिवाळी पहाट उपक्रम यशस्वी केला. कार्यक्रमातील सहभागी कलावंतांचा व साथीदारांचा सत्कार नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप,नांदेड उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर ,निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर व संयोजन समितीतील सर्व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. १९६० ते १९८० या कालखंडातील मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजेच गीत, संगीत आणि आशय यांचे अभंग त्रिवेणी संगम — या काळातील मधुर गाण्यांची सरमिसळ कलांगण प्रतिष्ठान प्रस्तुत ‘रुपेरी सोनसळा’ या नावाने रंगली. कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे होते. सिंगापूरस्थित प्रख्यात गायिका सौ. पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे व विजय जोशी यांनी मराठी चित्रपटांच्या अमर गीतांना नवसंजीवनी दिली.

सच्चिदानंद डाखोरे व स्वरांजली पांचाळ यांनी गायलेल्या “तू सुखकर्ता, तू दुखहर्ता” या गणेशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तुझ्यासाठी शंकरा भिल्लीण मी जाहले, जय देवी मंगळागौरी, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई हे अंगाई गीत, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, सख्या रे घायाळ मी हरिणी, इथूनी मी दृष्ट काढिते निमिष एक टाक तू , प्रथम तुझं पाहता जीव वेडावला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, हिलं हिलं पोरी हिला तुझ्या कपालीला टिळा,  आज आनंदी आनंद झाला, चंद्र आहे साक्षीला, मी जलवंती…. मी फुलवंती, तुझी नजर लागेल मला , बाई गं माझ्या पायाला बांधलाय भवरा, लबाड लांडग ढोंग करतय, आला आला वारा पावसाच्या धारा, अहो कुण्या गावाचं आलं पाखरू, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडीते, रेशमाच्या रेघांनी यासारखी श्रोत्यांच्या मनावर कायमची रुंजी घालणाऱ्या वैविध्यपूर्ण, अविस्मरणीय मराठी गाणी व लावण्या  या गायकांनी अतिशय ताकदीने उत्तम पद्धतीने सादर केल्या.   

या गाण्यांनी मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा गंध पुन्हा दरवळला — जेव्हा कथा भावस्पर्शी, गीतांमध्ये अर्थगर्भता आणि संगीतामध्ये आत्मा होता. या कालखंडानेच मराठी चित्रपटसृष्टीला कलात्मकता, सादरीकरण आणि संगीताच्या दर्जात नवे मापदंड दिले. तसेच हे चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक वास्तवाचे आरसे बनले. वसंत देसाई, सुधीर फडके, राम कदम, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि ग.दि. माडगूळकर, मंगेश पाडगावकर यांच्या गीतांनी चित्रपटांना आत्मिक उंची दिली. भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांपासून दादा कोंडकेच्या लोकाभिमुख विनोदी चित्रपटांपर्यंत विषयवैविध्य खुलले. संगीत, संस्कार आणि समाजभान यांच्या संगमाने या चित्रपटांनी मराठी मन जिंकले. निर्माते पत्रकार  आणि गायक विजय जोशी यांच्या दाम करी काम या गीताने तर बहारच केली.

कार्यक्रमाच्या अखेरीस “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भक्तिगीताने मैफिलीची सांगता झाली. संगीत नियोजन सिद्धोधन कदम व शेख नईम यांनी उत्कृष्टरीत्या केले. साथसंगत राज लांबटिळे, स्वप्निल धुळे, भगवानराव देशमुख, रवी कुमार भद्रे, रतन चित्ते यांनी केली. तबल्यावर स्वप्निल धुळे व सिद्धोधन कदम यांनी वाजवलेल्या तोडींनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी केले. ‘रुपेरी सोनसळा’ या संगीत मैफिलीने केवळ मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ उजळवला नाही, तर नांदेडकरांच्या हृदयात त्या काळातील सुरांचा सुवास पुन्हा फुलवला.

Nandedkar experienced the melodious and rich journey of the golden age of Marathi cinema through 'Ruperi Sonsala' the Padwa Pahat
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDiwali Wishes : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडून व्यापारी बांधव व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा
Next Article Himayatnagar Taluka Nationalist Party : हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गट) अध्यक्षपदी वामनराव पाटील, शहराध्यक्षपदी अमोल धुमाळे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

demanding a bribe of 25,000 : रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक गजानन मुतनेवाड व उपसरपंच संजय माझळकर यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई -NNL

November 7, 2024

Santhosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL

January 1, 2025

Prakash Marawar : नांदेड विमानतळ पोलिस स्टेशन स्थलांतर करा – प्रकाश मारावार -NNL

October 10, 2024

माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री संघ,भाजप, लायन्स तर्फे रविवार सकाळी ६ वाजता २३ व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन -NNL

June 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Marathi Journalists Association ; 1 फेब्रुवारीच्या सेलू येथील मेळाव्यास उपस्थित रहा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

Motorcycle Thift : बारूळ येथील घरासमोरील मोटारसायकलची चौरी -NNL

Gurmeetsingh Tamana ; गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति मिळावी : गुरमीतसिंघ टमाना

X -Ray mation : ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा

वनकामगारांचे मुखेड येथे आमरण उपोषण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?