Friday, June 26

Tag: the Padwa Pahat

Ruperi Sonsala : ‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाटमधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला

Ruperi Sonsala : ‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाटमधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला

नांदेड, मनोरंजन
नांदेड| मूकचित्रपटांच्या प्रारंभीच्या पडद्यापासून ते ‘दादा कोंडके’ यांच्या हास्यरसपूर्ण चित्रपटांपर्यंतचा मराठी चित्रपटसृष्टीचा झळाळता प्रवास नांदेडकरांनी ‘रुपेरी सोनसळा’ या मनोवेधक संगीत सोहळ्यात दिवाळी पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवला. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, बाळकृष्ण माडे, सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, जयमाला शिंदे, सुरेश वाडकर, हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुवर्णयुगाला उजाळा देणारा हा कार्यक्रम ‘पाडवा पहाट’च्या उत्सवी वातावरणात पार पडला. जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट' या उत्तरोत्तर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेल्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रातील पहिल्या कार्यक्रमाला नांदेड महानगरातील हजारो रसिक श्रोते उपस्थित होते.तसेच या कार्यक...
error: Content is protected !!