HomeनांदेडRabi seeds : नांदेड जिल्ह्यात 5 हजार 146 क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा...

Rabi seeds : नांदेड जिल्ह्यात 5 हजार 146 क्विंटल रब्बी बियाणे वाटपाचा लक्षांक

नांदेड| राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्ये, पौष्टिक तृणधान्ये पिके अंतर्गत 5 हजार 146 क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

हरभरा पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 5 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 2 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 2160 क्विंटल व 10 वर्षा वरील वाणांकरिता 2181 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे.

रब्बी ज्वारीच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 3 हजार रुपये प्रति क्विंटल व 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 100 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 260 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे.

गहू पिकाच्या 10 वर्षाआतील वाणासाठी 2 हजार रुपये प्रति क्विंटल वं 10 वर्षांवरील वाणासाठी 1 हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान देय असून, जिल्ह्याकरिता 10 वर्षाआतील वाणाकरिता 298 क्विंटल व 10 वर्षांवरील वाणांकरिता 147 क्विंटल लक्षांक प्राप्त आहे.

प्रमाणित बियाणे वितरण या घटकातंर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. वैयक्तिक शेतकरी यांनी संबंधित महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ/राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड/ कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड यासंस्थेच्या अधिकृत वितरकांमार्फत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वांवर लाभार्थी निवड करण्यात येत आहे. त्यासाठी अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack), आधार कार्ड, ७/१२ उतारा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच शेतक-यांनी उत्स्फूर्तपणे याबाबीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments