HomeनांदेडChhatrapati Shivaji Maharaj : सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन छत्रपती शिवरायांचा पुतळा...

Chhatrapati Shivaji Maharaj : सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन छत्रपती शिवरायांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्टचे नांदेडमध्ये स्थलांतर

नांदेड l सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन नांदेड शहरात महापुरुषांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्ट स्थलांतरित करित प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करित असल्याचा आरोप करुन बेकायदेशीरपणे स्थलांतरीत केलेल्या दोन्ही वाईनमार्टचे परवाने रद्द करण्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण व सहकांऱ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.६ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

IMG 20251007 WA0007 Chhatrapati Shivaji Maharaj : सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन छत्रपती शिवरायांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्टचे नांदेडमध्ये स्थलांतर

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी नांदेड वाईन मार्ट,शॉप व राजकॉर्नर चैतन्य नगर येथे कमल वाईनशॉप स्थलांतर करण्यात आले आहे.त्यासाठी सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आल्याने याबाबत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.तसेच, यापूर्वि मोफत दारु वाटप आंदोलनाचा ईशारा दिला होता.

 

परंतू,प्रशासनाच्या विनंतीनंतर त्याऐवजी कोल्ड्रिंक वाटप आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासनाने याबाबत दखल घेतलीच नसल्याने जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले व जिल्हाधिकारी कचेरीसमोर दि.६ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

यावेळी रत्नाकर जोंधळे, गौतम सिरसाट, बालाजी सिहं ठाकूर,संजय शर्मा ,व्यंकट दमकोंडवार,महेश पाटील आदींची उपोषणास उपस्थिती असून माजी नगरसेवक मुन्तजीब,माजी नगरसेवक शेर आली यांनी या उपोषणास भेट दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments