श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यात पीक कापणी प्रयोग करत असताना सध्या जास्त ओलावा असल्यामुळे वजन जास्त येत आहे त्यामुळे कापणी प्रयोग केल्यानंतरचे वजन आणि सात ते दहा दिवसानंतर सुकवल्यानंतर चे वजन दोन्ही नोंदवण्याचे पिक कापणी प्रयोगात पिक कोरडेपणाचे वजन ग्राह्य धरा असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिलेले आहेत. या संदर्भात प्रत्येक गावच्या सरपंच आणि शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्यात येऊन यावर्षीचा खरीप हंगाम 2025-26 येणारा पीकविमा हा पीक कापणी प्रयोगावर आधारित असल्यामुळे तहसीलदार अभिजित जगताप व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांच्याकडे निवेदन मार्फत अविनाश पुंडलिक टनमने किसान ब्रिगेड जिल्हा संघटक नांदेड यांचे सह शेतकऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे.


तालुक्यात एकूण १०८ ठिकाणी पिक कापणी प्रयोग यामध्ये सोयाबीन २४ गावात ४८ ठिकाणी तर कापूस २४ गावात ४८ तर तूर १२ असे होणार आहेत.तालुक्यात गटविकास अधिकारी कार्यालय व तालुका कृषी विभाग मार्फत ग्रामसेवक,कृषी सहायक,तलाठी यांच्या मार्फत पिक कापणी प्रयोग केले जात आहे. १५ ऑगस्ट पर्यंत नमुना तक्ता क्र.१ भरणे आवशक असताना काही विशीष्ट ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी अद्याप तक्ता क्र.१ digital अप मधेभरलेले नाहीत त्या कर्मचारयाची शेतकरी बांधवांच्या बाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे.


पिक कापणी प्रयोग काळजीपूर्वक करणे आवश्यक असतांना हलगर्जीपणा करणारे कर्मचारी कोण ? यावर वेळीच लक्ष्य देण्याची गरज आहे.तहसीलदार अभिजित जगताप व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड व गटविकास अधिकारी टाकरस यांनी पिक कापणी प्रयोग बाबत तत्काळ आढावा बैटक घेऊन कृषी व महसूल सांखिकी विभाग यांची चौकशी करण्याची मागणी माहूर तालुका किसान ब्रिगेड चे आगाखान पठाण,संदीप टनमने,श्याम जगताप,जिया खान फारुखी यांनी केली आहे.


राज्यात खरीप हंगाम २०२५ मधे झालेल्या अतिवृष्टीचा विचार करून सद्यस्थित पिकामध्ये अद्रता अधिक असल्याने पिक कापणी प्रयोग करीत असताना ओलावा वजन अधिक येत आहे त्यानुसार पिक कापणी प्रगोगासाठी दि.६/६/२५ रोजी मार्गदर्शक सुचनामधील मुद्धा क्र.४ मध्ये सविस्तर निर्देश देण्यात आले कि ज्या पिकासाठी कोरडेपनाचे प्रमाण नाही अशा पिकासाठी क्षेत्रीय पातळीवर ओलावा वजन आणि सुके/ वाळलेले वजन घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

तक्ता क्र.२ मध्ये काढणी वेळीचे (ओलावा वजन) घेऊन त्या पिकाचा छायाचित्र जतन करणे व त्यानंतर स्थानिक परिस्तीस अनुसरून ७ ते १० दिवसामध्ये धान्य वाळविल्यानंतर पूर्वी आलेले ओलावा वजन नमूद करून त्या मध्ये वाळविलेले वजन नमूद करून त्याचे छायाचित्र घेऊन जतन करून नमुना नंबर २ पूर्ण भरून जतन करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालय पुणे यांचे पत्र /आदेश सां-२/पिकाप्र/र-५८ /२०२५ यांचे आदेश दिले आहेत.या पत्रानुसार पिक कापणी प्रयोग करतांना कर्मचारी यांनी काळजीपूर्वक बाबी लक्षात घेऊन शेतकरी बांधवांच्या सहानुभूती विचार करण्याची मागणी माहूर तालुका किसान ब्रिगेड यांनी केली.


