Homeनांदेडराष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय, (क्षे.सं.प्र), उपक्षेत्रीय कार्यालय- नांदेड यांच्या वतीने स्वच्छता पखवाडा...

राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय, (क्षे.सं.प्र), उपक्षेत्रीय कार्यालय- नांदेड यांच्या वतीने स्वच्छता पखवाडा -NNL

नांदेड। सार्वत्रिक स्वच्छता कव्हरेज मिळविण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन सुरू केले. ज्याला सरकार द्वारा देशव्यापी मोहीम/जनआंदोलनाच्या रूपात राबवले जात आहे. यालाच पुढे नेत, भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय द्वारा दिनांक 16 जून ते 30 जून या कालावधीत स्वच्छता पखवाडा साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (क्षे.सं.प्र.), उप क्षेत्रीय कार्यालय,नांदेड यांच्या तर्फे दिनांक 19.06.2024 ते 20.06.2024 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (क्षे.सं.प्र.), क्षेत्रीय कार्यालय, नांदेड द्वारे दिनांक 19/06/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, शहाजी नगर नांदेड मधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात श्री शांतणु प्रमाणिक, प्रभारी वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी, राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण उप क्षेत्रीय कार्यालय,(क्षे.सं.प्र), नांदेड द्वारा कार्यक्रमाचे उद्दिष्ट व कार्यक्रमाचे स्वरूप विशद करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्यासाठी मार्गदर्शन केले. याशिवाय या कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले व शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी “स्वच्छतेची शपथ” घेतली.

सामान्य जनतेला स्वच्छतेचे फायदे समजावेत व त्यांनी त्यांच्या सभोवताली नेहमी स्वच्छता राखावी यासाठी उप क्षेत्रीय कार्यालय, नांदेड यांच्या वतीने कार्यालयाचे प्रमुख श्री.शांतणु प्रमाणिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक व विद्यालय, शहाजी नगर परिसरात पथ रैली काढून परिसरात जनजागृती केली।

दि 20/6/2024 रोजी काळेश्वर संस्थाणचे सचिव शंकरराव हंबर्डे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व‌ कार्यालयाचे प्रमुख वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी शांतनु प्रमाणिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काळेश्वर मंदीर संस्थान विष्णुपुरी च्या परिसरामध्ये पथनाट्यचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच संस्थान परिसरातील प्रसाद विक्रेते तसेच भविकानां स्वच्छतेबाबत सतर्क राहण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशवी अथवा कागदी लिफाफ्यांमध्ये खरेदी/विक्री करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम करण्यात आला. यासोबतच संस्थान परिसरात स्वच्छतेसाठी श्रमदान ही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी , कार्यालय प्रमुख, वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी शातणु प्रमाणिक राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण उप क्षेत्रीय कार्यालय, (क्षे.सं.प्र), नांदेड द्वारा शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक तसेच काळेश्वर संस्थाणचे सचिव शंकरराव हंबर्डे साहेब यांचे उपस्थित सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या दरम्यान कार्यालयाकडून वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी श्री अभिजित हालदर, राम नरेश,धिरज कुमार , व कार्यालयचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments