protest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

morcha protest by the Farmer : मुखेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीकडून सोमवारी (दि. 06 ऑक्टोबर 2025) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, तहसील कार्यालयासमोर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी व भीषण पुरामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेती उध्वस्त होऊन शेतकरी पूर्णतः खचला आहे. शासनाने केवळ हेक्टरी 8,500 रुपयांची मदत जाहीर केली असून, ही मदत अपुरी असल्याने संताप व्यक्त होत आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुढील प्रमुख मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट विना अट संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. पंजाब राज्याप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी. सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मंजूर करण्यात यावा. पूरग्रस्त गावांचे माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन व पक्की घरे बांधून देण्यात यावी. शासन आपल्या दारी कॅम्पद्वारे वाहून गेलेली कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावीत.

शेतकऱ्यांचे खाते होल्ड करणाऱ्या बँक मॅनेजरांवर फौजदारी कारवाई, दिरंगाई करणाऱ्या तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, खरडून गेलेल्या क्षेत्राचे योग्य लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क व घरांचे वीजबिल माफ करावे. आणिपडझड झालेल्या घर, विहिरींसाठी भरीव मदत द्यावी यासह अनेक मागण्या करण्यात येणार आहेत.

शेतकरी पुत्र संघर्ष समितीने सर्व शेतकरी व युवकांना राजकीय पक्षांच्या सभा टाळून आपल्या हक्कासाठी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शेजाऱ्यांनी “एकजूट दाखवली तरच सरकार नमणार,” आणि शेतकऱ्यांना या संकटातुन बाहेर काढण्यासाठी पुढे येईल असेही समितीने म्हंटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top