Chief Minister Samruddhi : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मुखयमंत्री समृद्धी कार्यशाळा संपन्न

panchayat Chief Minister Samruddhi : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मुखयमंत्री समृद्धी कार्यशाळा संपन्न

हिमायतनगत| येथील पंचायत समिती कार्यालयात सोमवारी मुख्यमंत्री समृद्धी अभियान तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत संयुक्त राष्ट्रसंघाने शास्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्येक्रम २०३० जाहीर केला.

सर्वांना सोबत घेऊन चला हा जागतिक कार्यक्रमाचा गाभा आहे .त्या अनुशंगाने शास्वत विकासाच्या नऊ संकलनाच्या आधारे १७ शास्वत विकासाचे ध्येय २०३० पर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थानचे मोठे योगदान असून गावातल्या तळागाळातल्या घटक पर्यंत केंद्र व राजे शासनाच्या विविध सार्वजनिक व वैक्तिक लाभाच्या योजना पोहोचण्या मध्ये ग्रामपंचायतीची मोठी भूमिका आहे त्या अनुषंगाने पंचायत राज संस्थाना प्रोत्सहन देऊन सक्षम बनविण्याच्या उद्देशाने ग्रामविकास मंत्री यांनी मुखयमंत्री समृद्ध पंचायत अभियान हि योजना सुरु केली आहे.

या कार्यशाळेत उपस्थित सरपंचांना माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी गटविकास अधीकारी पी के नारवटकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक गटविकास अधीकारी प्रल्हाद जाधव.माजी पं.स.सदस्य बालाजी राठोड , विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे,पी.जे.टारपे , अभियंता विशाल पवार, जोशी,
ग्रामपंचायत अधिकारी शैलेंद्र वडजकर, नारायण काळे, आनंद कदम,भोगे यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top