HomeनांदेडShakuntal School for Excellence ; शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सची विद्यार्थिनी गायत्री स्वामी...

Shakuntal School for Excellence ; शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सची विद्यार्थिनी गायत्री स्वामी हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा पत्र

नांदेड l नांदेड जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी बाब असून शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्समध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी गायत्री वैजनाथ स्वामी हिला थेट देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी स्वतःचे हस्ताक्षर असलेले शुभेच्छा व आशीर्वाद पत्र पाठवले आहे.

गायत्रीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वतःच्या हाताने सुंदर राखी तयार करून पंतप्रधानांना पाठवली होती. त्यासोबतच तिने सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहिताच्या योजनांविषयी सविस्तर पत्र लिहून त्या योजनांमुळे सामान्य जनतेला मिळणारा लाभ मनापासून व्यक्त केला होता.

गायत्रीचे हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतः वाचले व तिच्या या निष्पाप भावनेला व देशहिताच्या जाणिवेला अभिनंदन व शुभेच्छा देत तिला पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये मोदीजींनी लिहिले आहे की, देशातील मुलींनी पुढाकार घेऊन यश संपादन केले पाहिजे, तसेच शासनाच्या योजनांचे केलेले कौतुक हे त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

IMG 20250915 WA0008 scaled Shakuntal School for Excellence ; शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सची विद्यार्थिनी गायत्री स्वामी हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा पत्र

फक्त शुभेच्छाच नव्हे तर आशीर्वादही देताना मोदीजींनी एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख करून गायत्रीला प्रेरणादायी संदेश दिला आहे.

या अभूतपूर्व घटनेमुळे संपूर्ण शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, शिक्षकवर्ग, सहाध्यायी विद्यार्थी तसेच स्वामी परिवारामध्ये आनंद व अभिमानाचे वातावरण आहे. पालकांच्या डोळ्यात कौतुकाचे अश्रू आहेत तर शाळेतल्या शिक्षकांनी गायत्रीच्या या कार्याचा गौरव केला आहे.

आजवर लाखो पत्रे पंतप्रधानांकडे पोहोचली असली तरी गायत्रीचे पत्र विशेष ठरले कारण एका लहान मुलीने देशहिताच्या योजनांविषयी केलेले मनापासून कौतुक थेट देशाच्या पंतप्रधानांच्या हृदयाला भिडले.

ही घटना केवळ गायत्री व तिच्या परिवारासाठीच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची व प्रेरणादायी बाब ठरली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments