उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील मन्याड नदीखोऱ्यातील बारूळ , कौठा व नदीकाठावरील गावावर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका दिवसात २७५ मिलिमिटर पाऊस पडला. हा पाऊस शासकीय नुकसान निकषाच्या तीन पट जास्त आहे. त्यामुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. नदिकाठावरील तसेच ओढ्या नाल्या शेजारील शेतीचे पण अतोनात नुकसान झाले. हे नुकसान सहन करण्याची क्षमता ना… शेतीची आहे ना… शेतकऱ्यांची अशा आपतीच्या काळात सरकार मदत करू शकते परंतु त्यावरही खूप बंधन आहेत.


एन.डी.आर.एफ. चे प्रचलित निकष हे फारच तोडके आहेत. त्यामुळे एका विशेष आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने १) खरडून गेलेल्या शेतीसाठी हेक्टरी १ लाख रपये, पुरबाधित शेतीसाठी हेक्टरी ५०हजार रूपये , अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीसाठी हेक्टरी ३० हजार रूपये अशा स्वरूपाची मदत तात्काळ करण्यात यावी. 2) या नैसर्गिक आपतिमध्ये शेतकरी त्यांच्याकडील कर्ज फेडू शकणार नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावेत. 3)पुरामुळे बाधित झालेल्या घरांना तात्काळ मदत करण्यात यावी.

या प्रमुख तीन मागण्यासाठी दि.१२ सप्टेंबर २०२५रोज शुक्रवार या दिवशी सकाळी कौठा तालुका कंधार येथे राष्ट्रीय महामार्ग १६१ वर भव्य रस्तारोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यावतिने आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनाची दखल घेवून कंधार तहसील कार्यालयाचे महसूल नायब तहसीलदार ,कर्मचारी यांनी आंदोलन स्थळी येवून शेतक-याच्या वतिने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले.


वरिल मागण्या मान्य नाही झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते शिवसांब देशमुख यांनी दिला.यावेळी कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब, पोलीस उपनिरीक्षक कांबळे,पोलीस उपनिरीक्षक सानप व पोलीस दलातिल २५ कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी नेते शिवसांब देशमुख, ओमप्रकाश देशमुख, हणमंत घोरपडे,बबलू देशमुख, रवि कदम नामदेव कदम,बाळू काकडे,संजय डिकले,हणमंत जाधव, सुभाष कदम, यासह परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते.


