HomeनांदेडSiddheshwar Temple Osmannagar ; सिध्देश्वर मंदिर उस्माननगर येथे दीक्षा संस्कार, गुरूमंत्र व...

Siddheshwar Temple Osmannagar ; सिध्देश्वर मंदिर उस्माननगर येथे दीक्षा संस्कार, गुरूमंत्र व सोमवार उद्यापन सोहळ्याचे आयोजन

उस्माननगर l पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांना कळविण्यात येते की , उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथे श्री.सिध्देश्वर मंदीरात श्री. ष.भ्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांच्या दिव्य सानिध्यात दिक्षा , संस्कार , गुरूमंत्र , व सोमवार उद्यापन सोहळ्याचे आयोजन दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

विरशैव सांप्रदायामध्ये या विधीला अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे. पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांना सुवर्णयोगाचा दिन हा ११ ऑगस्ट सोमवार असून ज्या भक्तांना आपले जिवन , दिक्षा संस्कार, गुरूमंत्र व सोमवार व्रत , अशा सद् भक्तांनी उस्माननगर ( मोठी लाठी) ता.कंधार येथे सोमवारी दिक्षा संस्कार गुरूमंत्र घेणाऱ्या सर्व भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. दि ११ ऑगस्ट रोजी उस्माननगर येथील सिध्देश्वर मंदिरात वसमत मठाचे मठाधिपती श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न होणार आहे.

यावेळी सकाळी ८ ते ११ दिक्षा संस्कार , ११ते १२ उद्यापन सोमवार , १२ ते १ गुरुमंत्र , १ ते २ गुरुवर्यांचे अमृतोउपदेश त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. ज्या व्रतधारकांना आपल्या व्रताचे उद्यापन करावयाचे आहे.त्यांच्यासाठी हा सुवर्णयोग आहे. व्रत उद्यापन करणाऱ्या यजमानांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आयोजक कमिटीकडून कळविण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments