Monday of Shravan : पहील्या श्रावण सोमवारी २० हजाराहून अधिक भावीकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्वराचे दर्शन

हिमायतनगर, अनिल मादसवार| हर हर महादेव …परमेश्वर भगवान कि जयच्या गजरात सकाळी ५ वाजता हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणा वासीयांचे श्रध्दास्थान असेलल्या शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीचा पुरोहित कांता गुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत अभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ब्रम्हांड नायक, देवाचे देव मानल्या जाणाऱ्या श्री भोळ्या शंकरच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवाराचं (First Monday of Shravan) व्रत करनाऱ्यासह हजारो महिला- पुरुष भक्तांनी दिनांक 28 रोजी श्री परमेश्वर दर्शनासाठी रांग लावली होती. सायंकाळपर्यन्त जवळपास २० हजाराहून अधिक भावीकांनी दर्शन घेतल्याची माहीती मंदीर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली.


वृत्त वैकल्याचा महीना श्रावण मासाची सुरवात दि.२३ बुधवार पासुन झाली आहे. विदर्भ -मराटवाडयाच्या सिमेवर वसलेल्या हिमायतनगर (वाढोणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्वराचे मंदीर आहे. मंदीरातील भुयारात ७१५ वर्षापुवीची श्री परमेश्वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी एक अवतार असल्याचे सांगितले जाते आहे. भारतात कुठेही परमेश्वरची मुर्ती नसल्याने वाढोण्याच्या परमेश्वर दर्शनाला विदर्भ, आंध्रपदेश, कर्नाटकासह दुर – दुरहुन भावीक भक्त महाशीवरात्र, श्रावण मासात अवर्जुन हजेरी लावतात. मंदीरात लक्ष्मीनारायण, भव्य शिवलीग, निद्रीस्थ नारायण, भैरवनाथ, गणपती, हनुमान, आदिंसह अन्य देवी- देवतांच्या प्राचीन मुर्त्या आहेत. श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, रविवारपासून भागवत कथेला सुरुवात झाली आहे.


पहिल्या श्रावण सोमवारी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. “ॐ नमः शिवाय”, “हर हर महादेव” च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. बेलपत्र, धोतऱ्याची फुलं व दुर्वा अर्पण करत भाविकांनी महादेवाची पूजा केली. श्रद्धा, भक्ती आणि आस्था यांचा संगम असलेल्या या दिवशी हजारो भाविक भक्तांनी भक्तिभावाने श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाउन निघाला. माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी श्री परमेश्वरास बेलपत्र, पुष्पहार अर्पण करत भक्तिभावाने दर्शन घेऊन श्री परमेश्वर भगवान की जय.. हर हर महादेव नामाचा जयघोष केला. तसेच मंदिरात सुरु असलेल्या “ओम नमः शिवाय नामजाप” यज्ञात सहभाग घेतला.



श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट आणि परमेश्वर भक्त श्याम अण्णा मारुडवाड यांच्या वतीने देण्यात आलेल्या आसन खुर्चाचे लोकार्पण जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन तडेवाड, सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, गजानन सूर्यवंशी, संजय काईतवाड, संजय माने, गोविंद बंडेवार, प्रवीण कोमावर, संदीप आप्पा तुपतेवार, नितेश जयस्वाल, आदींसह अनेक भावीक भक्तांची उपस्थिती होती.

बळीराजा व सर्व जनतेला सुखी ठेव – माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर
दुपारी १ वाजता हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रीचे दर्शन घेतलं. श्री परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत मतदार संघातील बळीराजा व सर्व जनतेला सुखी ठेव, आलेलं संकट दूर कर, अशी मनोभावे प्रार्थना केली. तसेच दर्शनासाठी आलेल्या भावीक भक्तांना पवित्र श्रावण मासाच्या शुभेच्छा दिल्या.




