Tenth anniversary : दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संघटनेचा दहावा वर्धापन दिन; भव्य मेळावा

माहुर| येथे कपिलेश्वर धर्मशाळा येथे दि.१५ जुलै रोजी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संघटनेचा दहावा वर्धापन दिन, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व दोन दिव्यांग बांधव रेवा राठोड, प्रदिप शेरकुरवार यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा व दिव्यांग वृध्द निराधाराचा भव्य मेळावा माहुर तालुक्यातील पदाधिकारी यांनी उत्साहात साजरी केला आहे.

प्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,रेवा राठोड या तिघाचा एकाचवेळी शेकडो दिव्यांग, वृध्द, निराधाराच्या ऊपस्थित केक कापुन उत्साहात टाळ्यांच्या गजरात जन्मदिनी केक भरून कार्यकर्त्यांनी आर्शिवादरूपी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र वायरल न्यूजचे मुख्य संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते बबलू भालेराव हे होते.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक वक्ते दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, प्रमुख पाहुणे जिल्हा उपअध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,किनवट ता.अध्यक्ष अंकुश राठोड, ता.सचिव शेख बशिर हे होते.
प्रास्ताविक जिल्हा ऊपध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार यांनी‌ दिव्यांचा,वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र हि संघटना दहा वर्षापासुन अम्हिच डाकोरे साहेबांच्या विचारा बरोबर संघर्ष केल्यामुळे आज दिव्यांगाना न्मय हक्क मिळत आहे आहे.डाकोरे साहेब दोन्ही पायाने दिव्यांग असुन ते नेहमी दिव्यांग,वृध्द, निराधारांच्या प्रश्नांसाठी सतत संघर्षामुळे न्याय हक्क मिळत असल्याने आपण सर्वांनी डाकोरेच्या संघर्षात सहभागी व्हावे असे आव्हान केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघटनेचे माजी ता.अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांनी केले. संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांनी गत दहा वर्षांपासून आपण सर्वांनी संघटितपणे संघर्षासाठि एकत्रित सहभागी झाल्यामुळे व संघटनेच्या दोनशे सत्तर सदशिर आंदोलनामुळे आपणास हक्क मिळत आहे. आतापर्यत आपले आंदोलन प्रशासन ऑफिस वर केल्यामुळे अनेक प्रश्नांला न्याय मिळाला.

यापुढे कुंभकर्ण लोकप्रतिनिधीला जागे करण्यासाठी खासदार, आमदार यांना जागे करण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन करण्यास दि.१५: जुलै २०२५ते ३१ मार्च २०२६पर्यंत आमदार, खासदार यांच्या निवासस्थानी अर्धं नग्न अवस्थेत भिक मागो अनेक प्रकारचे आंदोलनाला सुरुवात माजी मुख्यमंत्री सध्याचे खासदार अशोकराव चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार राजेश पवार, आमदार हेमंत पाटिल, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यामुळे अनेक आमदार, खासदार दिव्यांगाचा निधी वाटप करण्याचे आश्वासन दिले व खासदार रविद्र चव्हाण यांनी दिव्यांग निधी पुढच्या महिन्यात दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी वाटप करण्याचे आश्वासन दिले.

दिव्यांगानि गनिमी काव्याने चालु असलेल्या अधिवेशनात प्रेवेश करण्यासाठी दि.९ जुलै रोजी मुंबई अधिवेशनात प्रेवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांच्या शक्तीपुढे दिव्यांचा घ्या वाहनासहित आझाद मैदानावर अटक करून पोलिस प्रशासनाने दिव्यांग शिष्टमंडळाची दिव्यांगकॉबिनेट दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष मा अतुल सावे यांच्यासोबत चर्चेत दिव्यांगाचा आमदार निधी शंभर टक्के वाटप करण्याचे व मुख्यमंत्री साहेबासोत संघटनेची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री मां.ऊदय सामंत यांनी आझाद मैदानावर दिव्यांगाच्या आंदोलनात भेट घेऊन सर्व प्रश्न सोडविण्यासाचे अश्वासन दिले. तसेच आपल्या किनवटच्या आमदारांना जागे करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आंदोलन करायचे काय? असे विचारताच एका आवाजात करायचे सर्वांच्या मते निर्णय घेण्यात आला त्यांचा दिनांक कळविण्यात येईल.

आणि दिव्यांगाना मिळणारा निधी ग्रामपंचायत, नगरपंचायत , नगरपालिका, महानगरपालिका पंचायत समिती,जिल्हा परिषद , आमदार,खासदार, निधी प्रत्येक ठिकाणाहून दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा निधीसाठी मिळतो ते आपण सर्वजन स़घटितपणे संघर्ष केल्याशिवाय मिळत नाहि आपण सर्वांनी संघटित पणे शासन प्रशासन जागे करण्यासाठी आतापर्यंत दहा वर्षांत अनेक प्रकारचे सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यामुळे आपणास हक्क मिळत आहे. सर्वांनी संघटित होण्यासाठी आव्हान केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक क्षेत्रात काम करणारे यु टुब संपादक मा.बबलु भालेराव ऊदिव्यांग चळवळ वाढविल्या शिवाय संघटितपणे संघर्षासाठि एकत्रित शक्ति निर्माण केल्याशिवाय आपल्या उपेक्षित समाजाला काहि मिळत नाहि मी नेहमी आपल्या संघटनेची चळवळ डाकोरे साहेबांचे कार्य ऑनलाईन पाहात असतो. त्यांची भेट आज मी फोन करुन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व चळवळीची माहिती पावसाचे दिवस असताना आपण दिव्यांग असुन मोठ्या संख्येने डाकोरे साहेबाना शुभेच्छा देण्यासाठी आलात मी सर्व पाहुन तुमच्या एकजुटिला सलाम करतो तुमच्या कार्याला शुभेच्छा व आपल्या कार्यासाठी तुमच्या सोबत आहे.

या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या.अध्यक्ष उमेश भगत राजूभाऊ,प्रेमसिंग चव्हाण, दादाराव कांबळे, हेमसिंग आडे ,रेवा राठोड ,राजेश सुकळकर ,अमोल सोनवणे, विष्णू गायकवाड, वनिताबाई पेटकुले, इंदुताई चपटेकर ,चित्रा इंगोले, आशाताई पिसाळ पुष्पा कलाने, सुमनबाई हगवणे, भिमराव आत्राम, आनंदराव आत्राम माहूर किनवट तालुक्यातील शाखा प्रमुख सहित शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. हा कार्यक्रम माहुर तालुक्यातील पदाधिकारी यांनी नाष्टा चहा पाण्याची,सर्वांचा सत्कार करून उत्साहात संपन्न झाला. असे प्रसिध्दी पत्रक माहुर ता.अध्यक्ष उमेश भगत यांनी दिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button