HomeनांदेडBhai Keshavrao Dhondge : भाई केशवराव धोंडगे यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही-...

Bhai Keshavrao Dhondge : भाई केशवराव धोंडगे यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही- प्रकाश गिरे पाटील

नांदेड| भाई केशवराव धोंडगे यांची १०४ वी जयंती सांस्कृतिक,सामाजिक,वैचारिक उपक्रमाने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळेमध्ये साजरी करण्यात आली यामध्ये हाळदा येथील श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भाई केशवराव धोंडगे यांच्या जीवनकार्यावर व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली होती यावेळी विचारवंत पी. बी. वाघमारे व अष्टपैलू फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गिरे पाटील यांची व्याख्याने संपन्न झाली.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांची शर्करातुला करून त्यांचे सत्कार करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे याविषयी प्रसिद्ध विचारवंत पी बी वाघमारे वाघमारे यांचे सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश गिरे पाटील यांची उपस्थिती होती ते बोलताना म्हणाले भाई केशवराव धोंडगे हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि साहित्यिक तर होतेच परंतु त्यांनी सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय ठरते.

कंधारच्या मातीत जन्माला आलेल्या भाई केशवरावजी धोंडगे उत्तुंग कर्तृत्व- प्रभावी परखड वक्तृत्व व सर्वसामान्य माणसाचा आवाज बुलंद करणारे कणखर नेतृत्व होते म्हणून त्यांना मन्याडचा वाघ म्हणून राज्यभर परिचित होते आताच्या काळात भाई केशवराव धोंडगे यांच्यासारखे निष्ठावान नेतृत्व पुन्हा होणे नाही असे प्रतिपादन व्याख्याते गिरे पाटील यांनी केले.

भाई केशवराव यांनी आपल्या कर्तुत्वाने तीन दशक विधानसभा आणि तीन वर्ष लोकसभा गाजवली ती गोरगरीब सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणूनच त्यांच्या आगळ्यावेगळ्या सत्याग्रहाने व आंदोलनाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका ही त्यांच्या वयाच्या शंभरीपर्यंत कायम होती.
त्यांनी रस्त्यावरती उतरून कष्टकरी शेतकरी बारा बलुतेदार जनता जनार्दनासाठी आवाज उठविला.

गुराखी राजांना बोलकं करण्यासाठी त्यांनी जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची सुरुवात केली आणि महान व्यक्तींची स्मारके त्यांनी उभे केले त्याचबरोबर भाई केशवराव जय क्रांती नावाने साप्ताहिक सुरू करून त्यातून प्रेरक समाज प्रबोधन पर लेखन केले व गोरगरिबांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले असे सर्वांग सुंदर निस्वार्थी व्यक्तिमत्व परखड बाणा असलेले निष्ठावंत शेकाप नेते भाई केशवराव यांच्यासारखे प्रामाणिक नेतृत्व होते.

मन्याड खोऱ्यातील डोंगरदऱ्यामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे काम हे मौलिक असून, वाडी तांड्यावरील शाळांमुळेच आजवर असंख्य विद्यार्थी शिकून मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत या संस्थेने अनेक प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, सामाजिक भान असलेले डॉक्टर, इंजिनीयर, इतकच नव्हे तर अनेक प्राध्यापक शिक्षक निर्माण केले आहेत. ही सर्व देन भाई केशवराव धोंडगे यांची आहे असे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रकाश गिरे पाटील यांनी भाई केशवराव धोंडगे यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री भगवान पवळे यांनी प्रास्ताविक व्यक्त केले तर विवेक बुरपले सर, एकाळे सर यांनी मनोगत मांडले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बामणे यांनी अध्यक्ष भाषण केले प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष रोहित पाटील शिंदे उपाध्यक्ष राजेश बुरपल्ले प्राथमिक विभाग शालेय समितीचे अध्यक्ष साहेबराव शिंदे शालेय समिती सदस्य राम मंदावाड तसेच पालक प्रतिनिधी म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुजरवार सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार डॉ. सुजाता कांबळे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments