HomeनांदेडMNS Vidyarthi Sena : नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करा -...

MNS Vidyarthi Sena : नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करा – मनसे विद्यार्थी सेना

 Make school boards in Nanded district in Marathi नांदेड| नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करण्यात यावेत अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष राम जाधव पाटील यांच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

नांदेड जिल्ह्यातील बहुतांश अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नामपलक इंग्रजी भाषेमध्ये नाम फलक लावण्यात आले असून, राज्यात शासन निर्णयानुसार शाळेचे नामफलक हे मराठीतच लावणे बंधनकारक आहे. असे असताना नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळेत मराठी ऐवजी इंग्रजी भाषेमध्ये नाम फलक लावण्यात आले असून, जिल्ह्यातील इंग्रजी भाषेतील नामफलक लावलेल्या शाळेवर तात्काळ कारवाई करून मराठीमध्ये शाळेच्या नामफल लावण्याचे आदेश त्वरित पारित करून आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

मराठी भाषा ही राज्यभाषा असून, मराठी भाषेचा आदर व सन्मान करणे सर्वांचे कर्तव्य असून मराठी ऐवजी इंग्रजी भाषेमध्ये नामपलक लावणे अत्यंत चुकीचे असल्याचेही जाधव यांनी निवेदनात नमूद केले. जिल्ह्यातील सर्व शाळांना शासन निर्णयानुसार मराठी मध्येच शाळेच्या नाम फलकाचे बोर्ड पंधरा दिवसाच्या आत लावण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष राम पाटील जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

नांदेड जिल्हा अध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, शहराध्यक्ष अब्दुल शफिक त्यांच्या मार्गदर्शनाने यावेळी उपस्थित विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत सिंह परदेशी, मनसे शहर सचिव महेश ठाकूर, साईकृष्ण पेल्लेवाड, शुभम धनेगावकर, यांच्यासह असंख्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments