Saturday, May 16

Teachers’ Counci : शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड

Venkat Gandapwad elected, District President of Teachers’ Council, Prahlad Rathod elected as District Executive नांदेड l विभागीय कार्याध्यक्षपदी बालाजी बामणे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, संघटकपदी ग.नु.जाधव यांची निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हास्तरीय शिक्षक मेळावा शहरातील हॉटेल ताज पाटील येथे जिल्हा प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे, राज्य कार्यवाह पुरुषोत्तम काळे, राज्यसंघटन मंत्री सुरेश दंडवते,राज्यकार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे,विभागिय अध्यक्ष संजय कोठाळे, विभागीय उपाध्यक्ष अजित केंद्रे,पतीपत्नी शिक्षकसंघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भिंगोले,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माधवी पांचाळ यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी राज्यातील शैक्षणिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. व उपस्थित शिक्षकांनी बदली धोरण,जुनी पेन्शन लागू करणे,जिल्हा पुरस्कार वेतनवाढ, केंद्रप्रमुख पदोन्नती याबाबत प्रश्न उपस्थित केले.यावर राज्य अध्यक्ष मधुकर उन्हाळे यांना हे सर्व प्रश्न शासनस्तरवर मांडु असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित जिल्हाभरातील शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित नुतन जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली.

यात जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड तर मराठवाडा विभाग स्तरावर कार्याध्यक्षपदी बालाजी बामणे,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील माळेगावकर,संघटक ग.नु.जाधव जिल्हानेतेपदीअशोक बावणे संभाजी आलेवाड दिंगंबर कुरे यांची तर जिल्हा कोषाध्यक्षपदी धोंडिबा पांडागळे.

जिल्हा कार्यालयीन सचिवपदी बळवंत मंगनाळे, जिल्हा प्रवक्तेपदी रवि ढगे, जिल्हा संघटन मंत्रीपदी संतोष साखरे,संजय मोरे, जिल्हा संपर्कप्रमुखपदी विश्वनाथ पाटील,संतोष देशमुख जिल्हा कार्याध्यक्षपदी नरसिंग एंड्रलवार, बालाजी पांपटवार, शिवराज साधु,दिगंबर शेळके,गंगाधर तोडे, अशोक पाटील सकनुरकर, सतीष पाटील सांगवीकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी महेश पाटील थडीसावळीकर विठ्ठल मुखेडकर जिल्हा सल्लागारपदी शंकर बेळकोणे, चंद्रकांत गोंड, मारोती गीते, वैजनाथ मिसे, संतोष दासरवाड,माधव पा. तिडके, रमेश पवार,ज्ञानेश्वर घोडके.

जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी गिरीश गरुडकर, रंगराव बारसे, मिथुन मंडलेवार, नागेश चिंतावार,संजय वाकोडे, वीरभद्र बसापुरे, रवी नेमान्नीवार,साहेबराव लांडगे जिल्हा उपाध्यक्षपदी बालाजी राऊतवाड, विजयकुमार आमटे, संजय वाघमारे, जी.डी. तावडे, संभाजी कदम सरसमकर, रमेश इटलोड, संभाजी पावडे, संगमेश्वर पडलवार

IMG 20250629 WA0001 Teachers' Counci : शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकट गंदपवाड तर जिल्हा कार्यवाहपदी प्रल्हाद राठोड यांची निवड

जिल्हा सहकार्यवाहपदी पांडुरंग दिनकर,व्यंकट आकेमोड, माधव रेडेवाड, डी. टी.जाधव, जितेंद्र वर्मा,भगवान खांडरे,शिवशंकर बोडके,आडे वकील, मुजाहेद शेख, सायलू शेकलोड, रघुवीर ठाकूर, गुणवंत मांजरमकर,व्यंकटेश पाचंगे,माधव केंद्रे, संग्राम नागलगावे, गजानन नीलकंठवार,आनंदा पेटकर जिल्हा संघटकपदी सुधीर शृंगारे, सुधाकर औरादकर, आर. आर. जाधव, भास्कर बोनलेवाड, मेहबूब शेख, हणमंत काऊलवार, गोविंद कोरबड,श्रीकांत मुक्कनवार, संजीव मानकरी, सचिन पाटील शेवाळकर, डी एन पाटील बेंबरेकर, मनीष राठोड, बालाजी गुंडाळे,प्रवीण बडेराव, कोंडीबा जायभाये,महेंद्र देवकांबळे आशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली.यावेळी शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!