कृषीनांदेड

Provide crop loan : शेतकर्यांना विनाविलंब पिक कर्ज मजुर करा – उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

देगलूर, गंगाधर मठवाले| शेतकर्यांना खरीपाची पेरणी करण्यासाठी लागत असलेले बि – बियाण्याची खरेदीसाठी अर्थीक बाजू कमकुवत झाली आहे. त्यामुळे बँकेने विलंब न करता शेतकर्यांना लवकरात लवकर पीक कर्ज वाटप करून दिलासा द्यावा. या मागणीसाठी उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने देगलूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवथापकाला निवेदन देण्यात आले आहे.

सद्यस्थितीत शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव नसून, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांची दयनीय अवस्था झाली आहे. राज्य शासनाचे पीक विमाचे धरसोडीचे धोरण सूरु असल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. आता शेतकऱ्यांचे आशा बँकेकडे पिक कर्जासाठी लागले असून, राज्य शासनाचे शेतकर्यांना सिव्हिल न पहाता त्वरीत पिक कर्ज मंजूर करून देण्याचे आदेश द्यावेत.

जेणेकरून बैन्कमध्ये शेतकर्यांची होणारी हेळसांड दूर होईल. यासाठी उद्धव ठाकरें शिवसेना पक्षातर्फे शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन व निर्दशने करण्यात आली. यावेळी सहसपर्कप्रमूक दयाल गिरी, उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, तालुका प्रमुख बालाजी पाटील, मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील, शहर प्रमुख मषणाजी पैलावार, उपशहरप्रमूख बाबुराव मिनकीकर, शिवसेना तालुका मीडिया प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शेकडो शिवसैनिक शेतकरी बांधव उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button