Homeनांदेडअवैध रेती वाहतूक करणाऱ्या तस्करावर अंकुश लावण्यात हिमायतनगर महसूल विभाग अपयशी -NNL

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तस्करावर अंकुश लावण्यात हिमायतनगर महसूल विभाग अपयशी -NNL

हिमायतनगर/वडगाव /पोटा, पांडुरंग मिराशे। कुणीही या ! ट्रॅक्टर घ्या! हायवा घ्या…आणि सरळ अवैध रेती उपसा ,आपलं व आमचं भांडवल वाढवा, असे म्हटले तरी हिमायतनगर तालुक्यात वावगे ठरणार नाही कारण येथील महसूल प्रशासनच दिवस-रात्र रेतीची तस्करी करणाऱ्या तस्करांना रान मोकळे करून देत असल्याचे सुजान नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या तारेवरची बाहुली बनलेले हे महसूल प्रशासक असल्याचे चित्र दिसून येत आहे नाममात्र एक दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही करून त्या कार्यवाहीचा डांगोरा जिल्हा भर वाजवीत आहेत हे मात्र कटू सत्य आहे. महसूल विभागाच्या मिली भगतीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्यास होऊन शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे असे सुजाण नागरिकांतुन बोलल्या जात आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे वेळीच लक्ष देऊन हिमायतनगर तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार थांबवावा असेही बोलल्या जात आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कामारी दिघी वीरसणी बोरगाव टाकराळा वटफळी,काडली आधी ठिकाणच्या पैनगंगा नदीच्या व उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास अवैध रेतीचा उपसा दररोज चालत असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. रेती तस्करी करणारे माफीये आपल्या हेराच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांच्यासी आपले अर्थिक संबंध ठेवून आहेत आर्थिक माया जमा करण्यात व्यस्त असलेले अधिकारी कर्मचारी रेतीमाफीया वरती हो सर दंडात्मक कारवाई करण्यास कमी पडत आहेत.

त्यामुळे विना परवानगी रात्रीला बळेगाव येथील वाळूची मोठी हायवा देखील महसूल विभागाच्या नाक्कावर टिचून अवैध वाहतूक करत आहेत. आत्तापर्यंत हिमायतनगर तालुक्यातील हजारो हायवा बांधकाम व्यवसायिक लोकांना रात्रीला चोरी छुपे 40 ते 45 हजार रुपये दराने आणून टाकली जाते आहे. मग शासनाने चालू केलेल्या वाळू डेपोच्या फायदा कुणाला होतोय.. ? महसूल विभाग यावर कार्यवाही का करत नाही,,, किंवा स्वार्थापोटी अभय देतात की… यदाकदाची कारवाई करण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला तर राजकीय पुढार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा दबावाखाली रेती माफियावर कारवाई करण्यास ते टाळाटाळी करीत आहेत तेव्हा महसूल प्रशासन हे राजकीय पुढार्‍याच्या तारेवरची बाहुली आहे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे जाणकार पर्यावरण प्रेमी नागरिकाच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

दिवस-रात्र पैसे कमावण्याचा व्यवसाय म्हणून अनेक धन दांडग्या व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या व्यवसायाचे कास धरली असून महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हातमेळणी करून अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे व रातोरात मालामाल होण्याचे स्वप्न बघत आहेत त्यांच्या स्वप्नाला खतपाणी घालणारे महसूल विभागांचे अधिकारी कर्मचारी तेवढेच जबाबदार असून शासनाच्या तिजोरी ते येणारा महसूल बुडत आहे . तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबींकडे लक्ष देऊ हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागात होत असलेल्या रेती तस्करीवर आळा घालावा अशी ओरड वातावरण प्रेमी नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments