Sunday, May 17

Mla. Chikhlikar’s vision : आ. चिखलीकरांचे लोहा विकासाचे व्हिजन २०३० शहराच्या भुयारी ड्रेनेजसाठी १५० कोटीं

लोहा| लोहा -कंधार तालुक्याचे तिसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी दिल्या नंतर या मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन २०३० “यावर विजयाच्या पहिल्या दिवसापासून आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपले काम सुरू केले आहे. लोहा शहरात भुयारी ड्रेनेज आराखडा तयार करण्यात आला असून १५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. नगर पालिका हद्दीतील प्रमुख व अंतर्गत रस्ते निर्मितीसाठी २००कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

लोहा -कंधार शहराच्या वेगवेगळ्या कामासाठी विकास निधी उपलब्ध करून घेण्यासाठी कामाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. लोहा शहर हे वाढती बाजारपेठ असून या शहराची होणारी चौफेर वाढ पाहता तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आ. प्रतापराव पाटील यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. राजकीय अडचणीच्या काळात या शहर त्याच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले आहे. याची जाणीव त्यांनी अनेकदा आपल्या भाषणात करून दिली.

दोन्ही तालुक्यात पुन्हा “प्रताप पर्व”,सुरू झाल्या नंतर आणि राज्याच्या राजकारणात त्याचे वाढलेले “वजन” जिल्ह्याच्या जनमाणसावर प्रभाव टाकणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्याकडे प्रतापरावाचा शब्द जसा प्रमाण आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही शब्दाला महत्व आहे. त्यामुळे निधीच्या बाबतीत काही अडचण येत नाही.

संपूर्ण लोहा शहर, बेनाळ, वाडी तांडे या भागात भुयारी ड्रेनेज करण्याचा मनोदय प्रतापरावांनी निवडणूक काळात व्यक्त केला होता त्यादृष्टीने आता काम अंतिम टप्प्यात असून, १५० कोटींचा प्रस्ताव सरकारकडे लवकरच सादर केला जाणार आहे. तसेच शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा यासाठीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत.

नगर पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्याना “हक्काचे दुकान” रूपाने
दिलासा देण्यासाठी बीओटी तत्वावर कम्प्लेक्स उभारणीचा संकल्प आहे. शहरातील नालीच्या पाण्यावर प्रकिया करण्याचा प्रकल्प, क्रीडा संकुलाचे अद्यावटिकरण यावर त्यानी लक्ष केंद्रित केले आहे. शादी खाण्याच्या जागेचा प्रश्न मार्गी लावणे तसेच उदगीर नंतर लोह्याचे बुद्धविहार पर्यटनस्थळ व्हावे , घरकुल योजना, महिला बचत गट, व विविध कामे निपटारा व्हावा यासाठी आ चिखलीकर प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने संबंधितांना सूचना दिल्या आहेत. शहराच्या विकासाठी आ चिखलीकर यांची अधिकाऱ्यांच्या सोबत शुक्रवारी (१३ जून) होणाऱ्या बैठकीकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!