नांदेडमहाराष्ट्र

Nanded Tahsil First Rank ; नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक; 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

नांदेड। शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.

या मोहिमेंतर्गत नांदेड तहसीलने पुढील महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रगती साधली आहे: डिजिटल तहसील नांदेड अ‍ॅपच्या माध्यमातून 23 योजनांची माहिती व 20 प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवांद्वारे आज पर्यंत अखेरपर्यंत १४ हजारहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. जलद प्रमाणपत्र वितरण सेवा सुरू करण्यात आली असून, 24 तासांत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा गुगल फॉर्मद्वारे उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत 217 नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. कार्यालयीन स्वच्छता, सुसज्ज प्रतीक्षागृह, आरो फिल्टरड पाणी व्यवस्था, डिजिटल लायब्ररी व सायबर वॉल प्रकल्प राबवून कार्यालयात आधुनिकतेचा अवलंब करण्यात आला आहे.

ई-ऑफिस प्रणालीच्या 100 टक्के अंमलबजावणीमुळे कार्यक्षमतेत मोठी वाढ झाली असून जानेवारी ते एप्रिल दरम्यान 127 ई-फाईल्स आणि 544 ई-रजिस्टरचे कामकाज पार पाडले गेले. तक्रार निवारणासाठी ‘लोकशाही दिन’, ‘आपले सरकार’ व पीजी पोर्टल’ यांचा प्रभावी वापर करून सर्व तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्यात आली आहे. एआय आधारित तंत्रज्ञान जसे की ChatGPT व Grok चा वापर करून कामाच्या कार्यक्षमतेत नवचैतन्य निर्माण करण्यात आले आहे. नांदेड तहसीलची ही प्रगती केवळ तालुक्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या कामा मध्ये नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार , काशिनाथ डांगे, नितेश कुमार बोलुलु , इंद्रजीत गरड, रवींद्र राठोड, सहाय्यक महसूल अधिकारी देविदास जाधव, कोटूरवार, सुचिता बोधगिरे, सुरेखा सुरुंगवाड, मंडळ अधिकारी शिवानंद स्वामी, लक्ष्मण नरमवार, व्‍यंकटी मुंडे, संतोष निलावार ,सचिन होंडाळकर, बालाजी नीलमवार सर्वच तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक कोतवाल मंडळींनी परिश्रम घेतले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!