क्राईमनांदेड

Local Crime Branch : नवऱ्यानेच दगडाने ठेचुन पत्निचा खुन केल्याचे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

नांदेड| भोकर येथील मिसिंग मधील महिलेचा जुना कौटुंबीक वाद मनात धरुन, जळतन आणण्यासाठी भोकर जवळील जंगलात नेवुन, डोक्यात दगड घालुन तिचा खुन केल्याची कबुली आरोपी नवऱ्याने दिली असून, नवऱ्यानेच दगडाने ठेचुन पत्निचा खुन केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सुरेखा मारोती टिकेकर वय 38 वर्ष रा. सावरगाव माळ त्ता. भोकर जि. नांदेड ही मिळुन येत नसल्याने तिचे वडीलांनी पोलीस ठाणे भोकर येथे दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक 22/04/2025 रोजी मिसींग क्रमांक 20/2025 प्रमाणे दाखल करण्यात आली होती.

दिनांक 26/04/2025 रोजी सदर मिसींगचा तपास चालु असतांना भोकर बायपास रोडवे बाजुला असलेल्या फुकटनगर पाझर तलावाचे लगत असलेल्या डोंगरावर एक मानवी अर्धवट कवटी, हाडे, डोक्याचे केस, पायातील पैंजन, जोडवे, चपल, साडी परकर व ईतर साहित्य मिळून आले. त्यावरुन वर नमुद मिसींग मधील महिला असल्याचे व तिचा कोणीतरी अज्ञात व्यक्तिने खुन केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले होते. त्यावरून मा. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर आकस्मात मृत्यू मधील महिलेच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेश दिले होते.

त्यावरून सदर मिळालेल्या मानवी अवयवावरुन यातील महिलेची ओळख पटविणे पोलीसांसाठी कसोटीचे काम होते. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनावरुन पोउपनि. साईनाथ पुयड व त्यांचे पथकाने गोपनीय बातमीदार नेमले होते. त्यांचेकडून अशी माहीती मिळाली की, यातील मयत महिलेच्या नवऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी असून, तो घटनेच्या दिवसापासुन गावातून बेपत्ता आहे. त्यावरुन दिनांक 28/04/2025 रोजी पोलीस उप निरीक्षक साईनाथ पुयड व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार सदर आकस्मात मृत्यु मधील संशईतांचा शोध घेत असतांना मयत महिलेचा नवरा हा नांदेड शहरात लेबरचे काम करीत असल्याची माहीती मिळाली.

त्यावरुन नांदेड शहरात सर्व ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची माहीती घेतली असता तो अण्णाभाऊ साठे चौकात असल्याची माहीती मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन, विश्वासात घेवुन घटनेसंबंधाने सखोल विचारपुस केली. यावेळी त्याने सांगीतले की, त्याने अदांजे 20 ते 25 दिवसापूर्वी जुना कौटुंबीक वाद मनात धरुन, पत्नी सुरेखा हिंस जळतन आणण्यासाठी तिस भोकर जवळील जंगलात नेवुन, तिचे डोक्यात दगड घालुन तिचा खुन केल्याची कबुली दिली. गुन्हयाबाबत अधिक सखोल तपास करुन, आरोपीचा कुठलाही ठावठिकाणा नसतांना प्रकरणातील गोपनीय बातमीदारांकडुन उपयुक्त माहीती हस्तगत करुन, आरोपीस ताब्यात घेवुन, सदरचे अत्यंत क्लिष्ट प्रकरण उघडकिस आणले आहे.

आरोपी नामे मारोती माधव टिकेकर वय 40 वर्ष व्यवसाय शेत मजुरी रा. सावरगाव माळ ता. भोकर जि. नांदेड यास पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे भोकर यांचे ताब्यात दिले आहे अशी पोलीस उप निरीक्षक श्री. साईनाथ पुयड यांचे पथकाने उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!