Homeनांदेडillegal encroachment holders : नांदेड पोलीस व महानगरपालीका यांचे समन्वयाने अवैध अतिक्रमण...

illegal encroachment holders : नांदेड पोलीस व महानगरपालीका यांचे समन्वयाने अवैध अतिक्रमण धारकावर धडक कारवाई

नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी शहरात वाढत असलेली ट्राफिक समस्या अटोक्यात आणनेसाठी तसेच शहरातील रस्त्यावरील अवैध अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरीक व वाहतुकीस होत असलेले नाहक त्रास यामुळे रस्त्यावरील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबविने बाबत आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाणे आज दिनांक 26.04.2025 रोजी चे सकाळी 10.00 वा. पासुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, उप विभाग, इतवारा चार्ज नांदेड शहर, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, पोलीस स्टेशन वजिराबाद यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका यांचेशी समन्वय साधुन त्यांचे समवेत शहरातील महाविर चौक ते वजिराबाद चौक, छ. शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत तसेच रेल्वेस्टेशन परिसर या मार्गावरील अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.

सदर शहरातील महाविर चौक ते वजिराबाद चौक, छ. शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत तसेच रेल्वेस्टेशन परिसर रस्त्यावरील अतिक्रमण काढणेबाबतचे मोहीमे दरम्याण अवैध अतिक्रमण, गाडे, फलक, बैनर व इतर अशा अवैध अतिक्रमण धारकांवर एकुण 90 हुन अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. दरम्याण अवैध अतिक्रमण हटविण्यात आलेले सामान महानगर पालीकेकडुन जप्त करण्यात आले आहे. तसेच रोडचे बाजुस लागणारे 10 वाहन यांचे वरती देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सदर अवैध अतिक्रमण मोहीमेमध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका उप-आयुक्त अजितपालसिंग संधु, सहाय्यक आयुक्त श्री सोनसळे, फरहत बेग आणि वार्ड अधिकारी जाधव साहेब असे महानगर पालीकेचे अधिकारी, 50 कर्मचारी असे सहभागी झाले होते. नांदेड पोलीस प्रशासनातील उप-विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा चार्ज नांदेड शहर मा. श्री सुशिल कुमार नायक, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, पोलीस स्टेशन वजिराबाद, पोरटे वजिराबाद येथील 04 पोलीस अधिकारी, 20 पोलीस अंमलदार असे हजर होते.

IMG 20250426 WA0031 illegal encroachment holders : नांदेड पोलीस व महानगरपालीका यांचे समन्वयाने अवैध अतिक्रमण धारकावर धडक कारवाई

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहीम यापुढे सुरू राहणार असून यापुढे कोणीही वाहतूकीस अडथळा निर्माण होईल असे अवैध अतिक्रमण करू नये केल्यास संबधीतांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments