HomeनांदेडGajanan Tekale : पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुका सचिवपदी गजानन टेकाळे...

Gajanan Tekale : पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुका सचिवपदी गजानन टेकाळे यांची नियुक्ती

देगलूर| पत्रकार संरक्षण समितीच्या तालुका सचिवपदी साप्ताहिक देगलूर टाइम्सचे संपादक गजानन शेषेराव टेकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या संपर्क कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तालुका अध्यक्ष शेख असलम यांच्या हस्ते टेकाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, कोषाध्यक्ष तोहिद काझी, सहसचिव मनोज बिरादार, प्रसिद्धी प्रमुख धनाजी जोशी, तसेच इस्माईल खान, अफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. गजानन टेकाळे यांच्या नियुक्तीमुळे पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा अधिक प्रभावीपणे लढला जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

दरम्यान, पत्रकार संरक्षण समितीची देगलूर तालुक्यातील शाखा स्थापन झाल्यापासून अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून, पत्रकारांसाठी ही संस्था आधारवड ठरली आहे. तालुक्यात या समितीची वाढती लोकप्रियता आणि कार्यपद्धती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments