Wednesday, May 13

H.B.P. Prabodhan Maharaj ; भगवंताचे “नामस्मरण” हा भक्तीचा सोपा मार्ग आहे…. ह.भ.प. प्रबोधन महाराज पाळेकर

उस्माननगर l एकाच ठिकाणाल जाण्यासाठी जसे अनेक मार्ग असतात. तसेच पायी चालताना आपण जवळचा आणि सोपामार्ग निवडतो. तसेच परमेश्वराची भक्ती धर्मपंथाप्रमाणे वेगवेगळ्या पध्दतीने आपण करतो, परंतु सगळ्यात सोमा मार्ग (देवाचे ) भगवंताचे नामस्मरण हा आहे. आपण प्रभुरामाचे सतत नामस्मरण करावे असे प्रतिपादन ह.भ.प . प्रबोधन महाराज पाळेकर यांनी केले.

ते उस्माननगर मोठीलाठ येथील राम मंदीरात रामजन्मोसवा निमित श्री शारदा वाचनालय चे वतीने आयोजित किर्तन प्रसंगी बोलत होते. ” रामनामा वाचोणी श्रेष्ठ नाही दुजा कोनी” या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर निरुपण करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले , जिवनात कठीण प्रसंगाचा सामना साधु संतानाही करावा लागतो .

आपली भक्ती अंत:करणातुन असावी पण तसे होत नाही ? पारमार्थिक अनुभवच सगळ्यांना सांगावे . आयोध्येत राममंदिर झाले धर्म टिकण्यासाठी चे कायदे सरकार करत ही आपल्यसाठी सर्वासाठी चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. वाचनालयाचे वतीनी श्यामराव जहागिरदार गुरुजी यांनी महाराजांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील सर्व भक्तमंडळी महीला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!