HomeनांदेडNMMS scholarship exam ; एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी विद्यालयाचे यश

NMMS scholarship exam ; एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत शिवाजी विद्यालयाचे यश

नवीन नांदेड l डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेने उल्लेखनीय यश प्राप्त केले. या शाळेचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली.

विमुक्त जाती प्रवर्गातून वैभव व्यंकट जाधव,इतर मागास प्रवर्गातून वैष्णवी संतोष जाधव, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून बालाजी दिपक आरगुलवार
खुल्या प्रवर्गातून वरद बालाप्रसाद गुडेवार, इतर मागास प्रवर्गातून शिवहार शंकर स्वामी,अनुसूचित जाती प्रवर्गातून श्रेया श्रीकांत गायकवाड तर खुल्या प्रवर्गातून श्रीनिवास बालाजी बडूरवार हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) साठी पात्र ठरले आहेत.

यावेळी एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंन्स्पायर ॲवॉर्ड स्पर्धेत सादर केलेल्या ‘फोल्डेबल लॅपटॉप स्टॅण्ड बीथ कुलिंग फॅन’ या विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याबद्दल दत्तात्रय राघवेंद्र कुलकर्णी या विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते व शाळेचे मुख्याध्यापक प्रा.साहेबराव देवरे, पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील,एस.एन.देवकर,प्रा.आर.आर.जाधव,प्रा.आर.आर.शिंदे व शंकर कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला.

आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य या योजनेचा गाभा आहे. या परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी दरमहा १००० रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे सहशिक्षक चंद्रकांत पावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव ,उपाध्यक्ष रवी जाधव,शाळेचे मुख्याध्यापक प्रा.साहेबराव देवरे,पर्यवेक्षक विकास पाटील,शाळेचे मुख्य लिपिक वसंत वाघमारे,प्रसिद्धी प्रमुख बी.बी.पाटोळे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी,त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments