नांदेड। शिवनगर येथील अयोध्या चौक येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.दुपारी ठीक 12 वाजता भगवा ध्वजा रोहन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


महाआरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला होता यात शेकडो राम भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.या सोहळ्यास प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता महिलांनी महाआरती करून प्रभू श्रीरामाचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार बालाजी कल्याणकर यांचे बंधू एकनाथ कल्याणकर हे उपस्थित होते. शिवनगर येथील श्रीराम भक्त मागील 4 वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करत करत आहेत.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी पत्तेवार,वैजनाथ स्वामी कार्यकारी संपादक दैनिक श्रमिक लोकराज्य, साई मंठाळकर,सचिन स्वामी,मोहन पाटील इंगळे,बालाजी पल्लेवाड,सुनील सोनटक्के,देविदास मठपती, कृष्णा मठपती,गणेश सोनटक्के,श्रीकांत रामपटवार, गजानन इंगळे,राजू पल्लेवाड, गजानन रामपटवार,गोविंद कुलकंठे,प्रशांत स्वामी,संतोष बारसे,गणेश बोईनवाड,संतोष शिंदे, गजानन पत्तेवार, पांचाळ, विष्णूकांत बतकुलवार, हनुमान अग्रवाल,रामेश्वर पल्लेवाड,राजू कदम,दत्ता कापकर, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचल वैजनाथ स्वामी व गजानन इंगळे यांनी केले.




