HomeनांदेडFinancial assistance : ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे...

Financial assistance : ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य

मुंबई| नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी ११ महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.

अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या.

WhatsApp Image 2025 04 04 at 4.24.27 PM Financial assistance : ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसाहाय्य
Financial assistance of Rs 5 lakh to the families of those killed in the accident when the tractor fell into a well

त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments