HomeनांदेडDr. Vijay Satbir Singh ; महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे...

Dr. Vijay Satbir Singh ; महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन गुरुद्वारा बोर्डाच्या विकासाबद्दल चर्चा – डॉ. विजय सतबीर सिंघ

नांदेड l डॉ. विजय सतबीर सिंघ, पूर्व IAS अधिकारी, प्रशासक गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे व नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री श्री अतुल सावे यांच्यांशी सदिच्छा भेट घेऊन गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या विकासाबद्दल चर्चा केली. त्यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्री राहुल करडीले सुद्धा उपस्थित होते.

यावेळी प्रशासक साहेबांनी गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामांबद्दल आणि शैक्षणिक संस्थांबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये प्रशासक साहेबांच्या प्रयत्नांनी सुरु झालेल्या नांदेड विमान सेवा हि सध्या देशातील एकूण ०९ शहराशी जुडलेली असून, या सेवेस मुंबई व देशातील इतर मोठ्या शहरांशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच गुरुद्वारा बोर्डातर्फे अनेक शैक्षणिक संस्था चालविल्या जात आहेत.

ज्यामध्ये CBSE स्कूल, ITI, आधुनिक लायब्ररी ज्यामध्ये इंटरनेट सुविधेसोबत अनेक स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांसहित प्रशिक्षण हि दिला जातो. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने श्री दशमेश रुग्णालय चालीविला जात आहे, ज्यामध्ये सध्या हृदयरोग तज्ञ, दंत तज्ञ, मधुमेह, रक्तदाब, डायलेसिस आदि सारख्या मोठ्या व महाग उपचार अति अल्प दरात सेवेच्या रुपात दिला जात आहे.

गुरुद्वारा दर्शनासाठी देशा-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी अति अल्प दरात निवासस्थान उपलब्ध असून भाविकांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन शेर-ए-पंजाब महाराजा रणजीत सिंघ जी यांच्या नावाने एक नवीन व आधुनिक निवासस्थानाच्या भव्य इमारतीचा काम प्रगतीपथावर आहे.

प्रशासक साहेबांतर्फे यावेळी गुरुद्वारा कर्मचार्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजनांबाबतदेखील चर्चा करण्यात आली. सिकलीगर समाजाबाबत हि यावेळी चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये सिकलीगर समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुद्वारा साहिबतर्फे सुरु असलेल्या सामुहिक विवाह महोस्तवा सारख्या अनेक जनकल्याण व समाजकल्याण कार्याबद्दल हि चर्चा करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments