नांदेडमहाराष्ट्र

Mahur Gad ; माहूर गडावरील स्कायवॉक प्रकल्पांची जिलाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l श्री रेणुकामाता मंदिरामुळे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक धार्मिक तसेच वन पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या माहूरच्या विकासामध्ये कोणताही खोळंबा होता कामा नये. त्यासाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभाग प्रमुखाची,व्यापारी यांची विश्राम गुह सभागुहात आज दि,१९ मार्च रोजी बैठक घेतली .

महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर येथे उभारण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज दुपारी माहूर गडावर पोहचले होते. त्यांनी यावेळी व्यापारी व स्थानिक नागरिकांशी सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा केली. स्कायवॉक हा प्रकल्प माहूरच्या वैभवात भर टाकणारा असून यामध्ये ज्या लोकांना आपली जागा द्यावी लागेल त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. व सुरू असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली व पाहणी केली. आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असणारे बदल वेळोवेळी करतांना स्थानिक नागरिकांचे म्हणणे लक्षात घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

यावेळी सहाय्यक जिलाधिकारी किनवट ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी विवेक कांदे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव,मंदिर विश्वस्त चंन्द्रकांत भोपी, संजय काण्णव, यांची उपस्थिति होती. या ठिकाणी उभारल्या जात असलेला लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाची पाहणी, गडावरील दुकानदारांच्या समस्या, रस्त्याचे विस्तारीकरण, सुशोभीकरण तसेच माहुरच्या विविध ठिकाणी भेटी देताना श्रद्धाळू व पर्यटकांना येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी, विश्वस्तांची चर्चा केली.

प्राचीन ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या माहूरगड यासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या परिसरातील अतिक्रमण, फेरीवाल्यांच्या समस्या आणि सर्व प्रलंबित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तत्पूर्वी त्यांनी माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button