Homeयळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात -NNL

यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात -NNL

श्रीक्षेत्र माळेगाव। उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने स्‍वागत करण्‍यात आले.

IMG 20221222 WA0049 यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात -NNLप्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा करण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आशाताई श्यामसुंदर शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा परिषद खाते प्रमुखांची उपस्थिती होती. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली यावेळी

IMG 20221222 224256 यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात -NNLमानक-यांचा गौरव – पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्‍यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा, पांडुरंग नारायण पाटील, माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकदंडे आष्टूर या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला.

IMG 20221222 WA0048 यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात -NNLखंडोबा यात्रेत वाघ्‍या-मुरळी – उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेजूरी उत्‍तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपारीक पध्‍दतीने कवडयाच्‍या माळा, माळी लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्‍या मुरळीला पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग् सकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, व्ही. आर. पाटील, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी एस. एच. वाव्हळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, संजय कऱ्हाळे, विजय धोंडगे आदींची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments