HomeनांदेडGujarati Primary School ; गुजराती प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा संपन्न

Gujarati Primary School ; गुजराती प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम सोहळा संपन्न

नांदेड l गुजराती प्राथमिक शाळेत वर्षभरात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदवला व बक्षीस पटकावले. यानिमित्त विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आज ता 18 रोजी शाळेत बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रम आयोजन करण्यात आले. छोट्या चिमुकल्यांनी आनंदात बक्षीस घेतले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत हे स्वागत गीताने केले.

कार्यक्रमासाठी गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक भाई दामा, सदस्य जयंतीलाल भाई पटेल, भावेशभाई नागडा, पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन दारकुंडे, सहसचिव दिव्या चव्हाण व शाळेचे मुख्याध्यापक दुर्गादास सापडगावकर, इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक दुबे सर, भानुमती वर्मा बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका दीप्ती पटेल व छंद वर्गाचे गजानन कुलकर्णी सर व पांडे सर यांनी दिपप्रज्वलन करून बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले.

गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक भाई दामा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दुर्राणी टीचर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. पाटील टीचर यांनी मानले कार्यक्रमात भानुमती वर्मा बालक मंदिर मधील छोट्या चिमुकल्यानाही बक्षीस देऊन त्यांचे ही कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता पहिली ते चौथी चे विद्यार्थी उपस्थित होते.अगदी शांततेत व शिस्तीत हा कार्यक्रम पार पडला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments