Homeनांदेडimmediately arrest the doctor : मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला...

immediately arrest the doctor : मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला तत्काळ अटक करा

नांदेड| भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील असताना हदगाव तालुक्यात अशी घटना घडणे, हे अत्यंत गंभीर आहे. या घटनेतील मुख्याध्यापकाला कठोर शिक्षा करून या कृत्यास हातभार लावणाऱ्या डॉक्टरला तत्काळ अटक करावी. अशी मागणी स्वराज्य पक्षाचे माधवराव पाटील देवसरकर यांनी केली आहे.

तामसा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तामसा येथील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाने केलेल्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र शासन भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील असताना अशी घटना घडणे, हे अत्यंत गंभीर आहे.

स्वराज्य पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष या नात्याने मागणी करताना ते म्हणाले कि, मी मागणी करतो की या घटनेतील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. या कृत्यास हातभार लावणाऱ्या डॉक्टरला तत्काळ अटक करावी. नांदेड जिल्ह्यात एक विशेष पथक नेमून अशा डॉक्टरांचं रॉकेट थांबवावे व कडक शासन करावे. या गर्भपात रॅकेटचा पूर्ण तपास करून त्यामागचे मोठे जाळे उद्ध्वस्त करावे. ही फक्त एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेची बाब आहे. दोषींना कठोर शासन झालेच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments